Tomato  sakal
लाइफस्टाइल

Tomato Health Risk: तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, नाहीतर...

टोमॅटोचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते.

Aishwarya Musale

अर्थात आजकाल टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असले तरी टोमॅटोशिवाय भाजीची चव आणि रंग बिघडतो. टोमॅटो ही सगळ्यांची आवडती भाजी आहे. तुम्ही ते भाज्यांमध्ये मिसळून खाऊ शकता आणि सलाड बनवूनही खाऊ शकता. याशिवाय टोमॅटो सॉस हा अनेक जणांचा जीव आहे. म्हणजे टोमॅटो हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मग असे मानले जाते की टोमॅटोमुळे नुकसान होते. हे खरे आहे का.

कोणत्याही गोष्टीप्रमाणे त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्याचप्रमाणे टोमॅटोचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते. त्याचे काही फायदे असतील तर काही तोटेही आहेत. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त टोमॅटो खाल्ल्याचा एक सामान्य दुष्परिणाम म्हणजे लाइकोपीनचा ओव्हरडोज. येथे आम्ही टोमॅटोच्या अतिसेवनाच्या वाईट परिणामांबद्दल सांगणार आहोत, हे लक्षात ठेवून तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल.

अॅसिडिटीची समस्या

टोमॅटो हे अॅसिडिक असतात, जे तुमच्या पोटात जास्त गॅस्ट्रिक अॅसिड तयार करण्याचे काम करतात. जास्त टोमॅटो खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात. जे लोक पाचन समस्या किंवा जीईआरडीने लक्षणे ग्रस्त आहेत त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी केले पाहिजे.

सांधे दुखी

टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी आणि एडेमाची समस्या उद्भवू शकते. कारण टोमॅटोमध्ये सोलॅनिन नावाचा अल्कलॉइड असतो. यामुळे सांध्यांना सूज आणि वेदना होऊ शकतात. टोमॅटो टीशूजमध्ये कॅल्शियम तयार करतात, ज्यामुळे पुढे जळजळ होऊ शकते.

अॅलर्जी

टोमॅटोमध्ये आढळणारा हिस्टामाइन हा घटक त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जीची समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला टोमॅटोची ऍलर्जी असेल तर त्याचे कमी प्रमाणात सेवन करा किंवा आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते.

तोंड, चेहरा आणि जिभेला सूज येणे, घशातील संसर्ग यांसारख्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया जाणवू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जर तुम्हाला टोमॅटोची ऍलर्जी असेल, तर त्याला स्पर्श केल्यास देखील तुमच्या त्वचेवर सूज आणि जळजळ होऊ शकते.

किडनी

किडनीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टोमॅटोचे सेवन करू नये. कारण त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. टोमॅटो, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप आणि इतर टोमॅटो-आधारित पदार्थांचे सेवन टाळल्याने रक्तातील पोटॅशियमची उच्च पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे किडनी समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT