Work form Home Esakal
लाइफस्टाइल

तासनतास ऑफिसमध्ये काम करताय? जाणून घ्या साइड इफेक्ट

अलीकडे या सवयीमुळे महिलांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळानंतर वर्क फाॅर होम करण्याचे प्रमाण वाढले. यातून लॅपटाॅप समोर तासनतासं काम करण्याची अनेकांना सवय जडली आहे. काम करत असताना एकाजागी १० तास आपण काम करतोय याची जाणीव बऱ्याच महिलांना नसते. अलीकडे या सवयीमुळे महिलांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहात का कि जास्तवेळ एकाजागी बसल्याने साइड इफेक्ट किती होऊ शकतात ते. चला तर जाणून घेऊया.

थकवा

क्वींसलैंड यूनिवर्सिटी (ऑस्ट्रेलिया) च्या संशोधकाने सांगितले कि, ज्या महिला रोज किमान १० तास एकाजागी बसून काम करतात अशा महिलांना जास्त थकवा जाणवतो. या संशोधकाने गेल्या १२ वर्षापासून बैठे काम करणाऱ्या महिलांचा अभ्यास केला आहे.

रोगप्रतीकार शक्ती कमी होते

आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती खूप महत्वाची आहे. आरोग्याच्या समस्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक आहे. मात्र, एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते. खूप वेळ काम करणाऱ्या महिलांनी काम करत असताना मधेमधे अॅक्टीव्हिटी करत राहिले पाहिजे.

साइड इफेक्ट होऊ नये म्हणून या टिप्स करा फाॅलो

-थोड्या-थोड्या वेळाने खूर्चीतून उठून बाहेर जाऊन या

- काम करत असताना मधे-मधे उभे राहण्याचा प्रयत्न करा.

-तुमचे जेवन कॅन्टीनमध्ये करा. तिथे बसून जेवून घ्या.

- तुम्ही मान आणि खांदे मधे-मधे स्ट्रेच करा.

-फ्रेश हवेसाठी थोडावेळ बाहेर जाऊन या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT