लाइफस्टाइल

गावकऱ्यांची कमाल!१५ फूट खोल विहिरीत अडकलेल्या हत्तीची केली सुटका

शर्वरी जोशी

सध्या सोशल  मीडियावर ओडिशामधील मयूरभंज या गावाची जोरदार चर्चा रंगली आहे. या गावातील नागरिकांनी एका हत्तीचे प्राण वाचवले आहेत. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यामुळे एका हत्तीचं पिल्लू १५ फूट खोल विहिरीत पडलं होतं. मात्र, गावकऱ्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने या हत्तीला सुखरूप बाहेर काढलं आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी झारखंडच्या दिशेने हत्तींचा कळप ओडिशामध्ये आला होता. यावेळी घनदाट जंगलातून मयूरभंजच्या दिशेने जात असतांना हत्तीचं एक पिल्लू रात्रीच्या अंधारात १५ फूट खोल विहिरीत पडलं. रात्रभर हे पिल्लू या विहिरीत अडकून पडलं होतं. सकाळी काही गावकऱ्यांना या हत्तीला विहिरीत पडल्याचं पाहिलं. त्यानंतर त्यांनी या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अथक प्रयत्न करुनही  या हत्तीला बाहेर काढण्यात यश आलं नाही. त्यामुळे मग गावकऱ्यांनी अग्निशमन दल आणि वनाधिकाऱ्यांना याविषयीची माहिती दिली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले व अथक प्रयत्न करुन त्यांनी या हत्तीला बाहेर काढलं. विशेष म्हणजे जेसीबी मशीनच्या सहाय्याने या हत्तीला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Latest Marathi News Live Update : वसईत ऋषिकेश वैद्यचा शोध सुरू; पुणे पोलिसांची विविध पथके रवाना

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात वीजदर १० ते १४% ने कमी होणार; नवे दर कधी लागू करणार?

Pune Baramati Shuttle: पुण्यातून धावली ‘राजमाता जिजाऊ’ शटल; पुणे-बारामती मार्गावरील सेवेला प्रारंभ, महिला सुरक्षेला प्राधान्य!

SCROLL FOR NEXT