लाइफस्टाइल

Viral Video : JCB पाहून हत्तीचा राग अनावर, त्यानंतर....

शर्वरी जोशी

असं म्हटलं जातं की हत्ती हा सगळ्यात मायाळू प्राणी आहे. परंतु, ज्यावेळी त्याला राग येतो त्यावेळी तो कशाचाही विचार न करता थेट एखाद्यावर हल्ला चढवतो. सोशल मीडियावरही हत्तीच्या संतापाचे किंवा त्याने घातलेल्या धुडगूसचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्येच आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशाच एका संतापलेल्या हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ रागाच्या भरात हत्तीने चक्क JCBवर हल्ला चढवला.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हलणारा JCB पाहून हत्तीला राग अनावर झाला आणि त्याने थेट JCB वरच हल्ला चढवला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक हत्ती शेतात उभा होता. तर दुसरीकडे JCB च्या मदतीने शेतात खोदकाम सुरु होतं. JCB ची सतत होणारी हालचाल पाहून या हत्तीला राग आला त्यामुळे प्रथम त्याने JCB ला जाऊन टक्कर मारली. त्यानंतर पुन्हा जाऊन त्याला जोरजोरात धक्का देऊ लागला. विशेष म्हणजे JCB जवळ आला की हत्ती घाबरायचा आणि धावत पळून जायचा. मात्र, परत यायचा आणि JCB वर हल्ला करायचा.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये कधी हत्तीचा अल्लडपणा दिसत आहे. तर कधी त्याचा राग त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २५ हजारांपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT