Tomato  sakal
लाइफस्टाइल

Tomato Side Effects: कोणत्या लोकांनी टोमॅटो खाऊ नये, जाणून घ्या

सध्या सर्वच भाज्यांचे आणि खासकरून टोमॅटोचे दर संपूर्ण उत्तर भारतात कमालीचे वाढले आहेत.

Aishwarya Musale

टोमॅटो हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय प्रत्येक भाजी किंवा डाळीची चव अपूर्ण आहे. टोमॅटो आता चांगलाच महागला आहे. गेल्या काही आठवड्यात टोमॅटोच्या दरात खूप वाढ झाली आहे. टोमॅटोचे भाव वाढत असताना काहींनी अनेक पर्याय शोधले आहेत.

अर्थातच टोमॅटो आपल्या जेवणाची चव वाढवतो पण काही लोकांचे नुकसान देखील करतो. अॅसिड रिफ्लक्सच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांना टोमॅटो हानी पोहोचवू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टोमॅटोमुळे अशा लोकांच्या पोटात जळजळ होऊ शकते. याशिवाय ज्या लोकांना टोमॅटो खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, अपचन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आहेत, त्यांनी टोमॅटोचा आहारात समावेश करू नये.

किडनी स्टोन

काही लोक किडनी स्टोनमुळे टोमॅटो टाळतात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यांना ऑक्सलेट स्टोन आहे त्यांनीच टोमॅटो खाणे टाळावे. टोमॅटोमध्ये ऑक्सलेट नावाचा पदार्थ असतो, जो संवेदनशील व्यक्तींमध्ये ऑक्सलेट स्टोन वाढवू शकतो. अशा कोणत्याही परिस्थितीत, आरोग्य तज्ञाशी बोलल्यानंतरच आहारात टोमॅटोचा समावेश करा.

ऍलर्जी

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की काही लोकांना टोमॅटोची ऍलर्जी देखील असू शकते. अशी प्रकरणे दुर्मिळ आहेत, परंतु यामुळे खाज आणि सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात. टोमॅटोची ऍलर्जी असल्यास ते खाणे टाळा.

ब्लड क्लॉटिंग

आम्ही तुम्हाला सांगतो की टोमॅटोमध्ये असे कंपाउंड्स असतात जे ब्लड क्लॉटिंगच्या औषधांमध्ये व्यत्यय आणू शकतात. जे लोक रक्त पातळ करणारे औषध खातात त्यांनी टोमॅटो टाळावे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के असते, ज्यामुळे या औषधांचा प्रभाव कमी होतो. तुम्ही देखील अशी औषधे घेत असाल तर तुमच्या आरोग्य तज्ञाशी चर्चा करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

Budget 2026: अर्थसंकल्पाची सूत्रे 'या' महिला अधिकाऱ्याच्या हाती! निर्मला सीतारमण यांच्या सोबत बजेट तयार करणारी टीम कोण? वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT