beauty saloon marketing
beauty saloon marketing sakal
लाइफस्टाइल

‘सोल्युशन’च्या शोधातून उद्योगाचा विस्तार

सकाळ वृत्तसेवा

- नयना चोपडे, महिला उद्योजिका

मर्यादा पाळून काम करण्याची कुटुंबातून मिळालेली मुभा आणि लहानपानापासूनची काम करायची सवय या दोन गोष्टीमुळे मी स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकले. मी एका जकात नाक्यावर चलन बनवायचे काम वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी सुरू केले होते. त्यामुळे लहानपणापासूनच कष्टाने पैसे कमविण्याची जाण होती. त्यावेळी मला एक सवय लागली, ती म्हणजे एकदा झालेली चूक पुन्हा करायची नाही...

त्याचे झाले असे, की जकात नाक्यावर काम करत असताना काहीवेळा चलन चुकत असे. गाड्यांचे नंबर, गाड्यांमधील मालाची माहिती अशांची नोंद करताना चूक होत असे, त्यामुळे वेतनातून पैसे कमी केले जात असत. त्यांनतर मी ठरवले, की ही चूक पुन्हा होऊ नाही होऊ द्यायची आणि मी काही कोड ठरवून त्यानुसार काम करू लागले. त्यानंतर मी पुन्हा नाही चुकले.

हे सांगण्यामागील कारण असे, की आयुष्याच्या प्रवासात आपण काही वेळा चुकतो त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो. बहुधा तो विपरीत परिणाम असतो. त्यामुळे आपण काही नियम स्वतःला लावले, तर ते आपल्याबरोबर आयुष्यभर राहतात आणि त्याचाच अवलंब मी आता माझ्या व्यवसायातही करते. त्या सवयीचा मला नेहमीच फायदा झाला.

अपूर्ण स्वप्न

मला पोलिस अधिकारी व्हायचे होते. लहानपणापासून काम करत मी माझे शिक्षण पूर्ण केले, पोलिस अधिकारी होण्यासाठी माझा अभ्यास सुरू ठेवला. त्या दरम्यान माझे लग्न झाले आणि नाशिकवरून पुण्याला यावे लागले. लग्नानंतरही मी परीक्षा देत होते आणि उत्तीर्णही झाले. मात्र, त्यासाठी नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी घराबाहेर राहावे लागणार होते. तेव्हा मला घरातून त्यासाठी नकार मिळाला आणि कुटुंब म्हणून माझी जबाबदारी लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे पोलिस व्हायचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले.

उद्योगाची प्रेरणा

कुटुंबाची जबाबदारी संभाळत मी काही करू शकते का, हा विचार माझा पाठलाग करत होता आणि मी शोध घेत होते. काही कोर्सेसही करून बघितले. घर बसल्या काही सुरू करता येईल का म्हणून आणि ‘ॲपल सलून’ सुरू केले. घरातील थोड्याशा जागेचा वापर करायचा ठरवला आणि स्वतःचाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरातून साथही मिळाली.

तेव्हा मी स्वतःच माझ्या‘ब्युटी सलून’चे मार्केटिंग सुरू केले. जवळची मेडिकल, बेकरी, किराणा मालाची दुकाने यांचा वापर करून मी मार्केटिंग सुरू केले. दुकानाच्या मालकाला मी ५० रुपये देत असे आणि सलूनच्या ऑफरची जाहिरात करत होते. वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळू लागला होता.

त्यामुळे हे सलून मोठे करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि मी आर्थिक जुळवाजुळव सुरू केली. तेव्हा वर्तमानपत्रांतून समजले, की जिल्हा उद्योग केंद्रातून व्यावसायासाठी कर्ज मिळते आणि मी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि सात महिन्यांनंतर मला दोन लाख ६५ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. तेव्हा मी कर्वेनगरला १९९३ मध्ये माझे स्वतःचे सलून सुरू केले.

उद्योगाचा विस्तार..

मी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली, त्यानंतर मुलांच्या शिक्षणामध्ये; तसेच करिअरमध्ये नेहमी सोबत राहिले. मी २०११ मध्ये फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. आता आमच्या ‘ॲपल सलून’ची पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ५७ आउटलेट्स आहेत. त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र आणि त्यानंतर आता बिहारमध्ये जाऊन पोचलो आहोत.

‘सोल्युशन’ शोधत राहा

चुकणाऱ्या गोष्टीवर कायमचा उपाय शोधणे. त्यावर पुनःपुन्हा काम करावे नाही लागणार याची खबरदारी मी घेते. मी ११४ गोष्टींवर मात करण्याचा अभ्यास केला आणि माझ्या क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी तयार राहिले. कोरोना काळातही मी त्याचा अवलंब केला. कोणत्याही आव्हानावर तात्पुरते उपाय न शोधता त्यावर मात करण्यासाठी आणि ती परिस्थिती पुन्हा उद्‍भवली, तर त्यासाठी आपल्याकडे कायमस्वरूपी उपाय असणे गरजेचे आहे. पर्मनंट सोल्युशन शोधणे नेहमी गरजेचे आहे.

(शब्दांकन : सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT