लाइफस्टाइल

Eye Care Tips: मुलांना कमी वयातच चष्मा लागलाय? हे 5 सुपरफुड्स डोळ्यांची दृष्टी सुधारतील

लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात 'हे' पदार्थ

Aishwarya Musale

प्रत्येक लहान मुलाचा आजकाल मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक लहान मुलं तर मोबाईल नसेल तर जेवत सुद्धा नाहीत, त्यामुळे त्यांचा हट्ट नाईलाजाने पालकांना पूर्ण करावा लागतो. पण या वाढलेल्या स्क्रिन टाइममुळे लहान मुलांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होऊन त्यांची दृष्टी कमजोर होते असल्याचे दिसत आहे.

डोळे निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. तसेच आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपले डोळे चांगले ठेवण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयी नीट राखणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. वाढत्या वयाबरोबर दृष्टी कमकुवत होते.आम्ही तुम्हाला सांगतो की, दृष्टी वाढवण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करावा.

तुमची दृष्टी चांगली राहण्यासाठी तुम्ही माशांचे सेवन करू शकता. जर तुम्ही याचे सेवन केले तर तुमच्या डोळ्यांना चष्मा कधीच लागू शकत नाही.माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर असते.

तुम्ही रोज सकाळी ड्रायफ्रुट्स खावे, यामुळे तुमचे शरीर फिट राहते आणि तुमचे डोळेही चांगले राहतील. ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर असलेल्या अशा पदार्थांचे सेवन करावे.

लिंबूवर्गीय फळांचे सेवन करणे देखील तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे डोळे निरोगी ठेवते आणि दृष्टी सुधारते.

पालेभाज्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. त्यांच्या सभोवती ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या पोषक घटक असतात जे तुमचे डोळे चांगले ठेवण्यास मदत करतात.

अंड्याचे सेवन डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज सकाळी अंडी खावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT