लाइफस्टाइल

Health Care News : 'या' जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दूरदृष्टी होऊ शकते कमजोर, जाणून घ्या

'या' जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दूरदृष्टी होऊ शकते कमजोर

Aishwarya Musale

अनेकांना कमी वयातच हृदयविकार, मधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. हल्ली तरुण किंवा लहान मुलांमध्ये दृष्टी कमी होणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. खराब जीवनशैली, जास्त टीव्ही पाहणं किंवा मोबाईल वापरणं ही त्याची प्रमुख कारणं असल्याचं मानलं जातं

डोळ्यांच्या आरोग्याचा विचार केला तर त्यात जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की ते कोणते व्हिटॅमिन आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे दृष्टी कमजोर होते.

या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दूरदृष्टी होऊ शकते कमजोर

डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. जर तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला दिसत नसेल तर त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्हिटॅमिन ए ची कमतरता. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कॉर्निया जास्त कोरडा होतो. यामुळे तुमच्या डोळ्यात जळजळ होते. व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी तुम्ही गाजर, पालक, पपई, लाल शिमला मिरची यांचा समावेश करू शकता. व्हिटॅमिन ए असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. जर तुम्ही पौष्टिक अन्नाचे सेवन केले नाही तर व्हिटॅमिन ए ची कमतरता होऊ शकते.

ही लक्षणं दिसत असतील तर समजा की तुमची नजर होतेय कमजोर

डोळ्यांना खाज येणे

लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येऊ लागतो. अशा स्थितीत डोळ्यांना खाज सुटू लागते.

सकाळी उठल्यावर अस्पष्ट दिसणे

सकाळी उठल्यावर काही तासांसाठी अस्पष्ट दिसू शकते. अशा वेळी तुम्ही कितीही वेळा डोळे धुवा पण तरीही तुम्ही पूर्णपणे स्पष्टपणे पाहू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; माहिती मिळताच ACB चा सापळा, ठाण्यातील मोठा अधिकारी अटकेत

MRP Protest Delhi: एमआरपीतील त्रुटींविरोधात जंतर-मंतरवर राष्ट्रीय आंदोलन; महाराष्ट्रातून ५०० कार्यकर्ते नवी दिल्लीत रवाना

Latest Marathi News Live Update : ‘काळा पैसा आणि कर आकारणी कायद्या’अंतर्गत अनिल अंबानींविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

SCROLL FOR NEXT