Eyebrow Esakal
लाइफस्टाइल

Eyebrow : आयब्रो करताना 'या' गोष्टी केल्या तर होणारे वेदना आपोआप कमी होतील...

भुवयांना व्यवस्थित शेप करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो.

सकाळ डिजिटल टीम

डोळ्यांवरील भुवया हा विषय जितका नाजूक आहे तितक्याच भुवयासुद्धा नाजूक असतात. भुवयांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. भुवया हा चेहेऱ्यावरील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्या चेहेऱ्याच्या सुंदरतेत भर पाडण्यात भुवयांचे मोठं योगदान आहे. भुवयांचे केस वाढल्यावर त्या विचित्र दिसतात. 

आयब्रो केल्याने चेहेऱ्याला येणाऱ्या छान लूकमुळे ते करावेसे वाटतात, पण ते करताना होणाऱ्या वेदनेमुळे काही स्त्रियांना आयब्रो करणे म्हणजे मोठं संकटच वाटत.  
आयब्रो करताना जर तुम्हाला जास्त वेदना होत असतील. अश्यावेळी आयब्रो करण्यापूर्वी त्या भागावर बर्फाचा शेक द्यावा. जेणेकरून बर्फाने तुमची स्किन सुन्न पडेल व आयब्रो करताना तुम्हाला जास्त वेदना होणार नाहीत.      
आयब्रो करताना जर तुम्ही प्लकर वापरत आहात. तर जुने किंवा गंजलेले प्लकर वापरणे टाळा. यामुळे तुमच्या डोळ्यासारख्या नाजूक भागाला इजा होण्याची शक्यता असते
आंघोळ झाल्यानंतर आयब्रो करा. आंघोळ केल्यानंतर भुवयांच्या भागातील हेअर फॉलिकल्स ओपन होतात. त्यामुळे भुवयांचे केस सहजरित्या निघतात. 
आयब्रो करण्यापूर्वी जी भुवई तुम्ही कोरणार आहात त्या भुवईला बोटांच्या साहाय्याने जोर देऊन मालिश करून घ्या. यामुळे त्या भागातील हेअर फॉलिकल्स लूज पडून भुवयांचे केस सहजरित्या काढता येतील.
आयब्रो करून झाल्यानंतर त्या भागावर थंड कोरफडीचे जेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या.
जर तुम्ही प्लकिंगचा वापर करून आयब्रो करणार असाल तर, भुवयांच्या केसांना हलकेच वरून न खेचता त्या केसांच्या रूट्स पासून खेचून वेगळे काढा. यामुळे वेदना कमी होऊन आयब्रोला व्यवस्थित शेप येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT