Lipstick  Sakal
लाइफस्टाइल

Fact About Lipstick : लिपस्टिक निर्मितीसाठी केला जातो प्राण्यांचा वापर; जाणून घ्या लिपस्टीक कशी बनते

एखाद्या महिलेला मेकअपची फारशी आवड नसली तरी, तिच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक सापडतेच.

सकाळ डिजिटल टीम

Fact About Lipstick : अनेक महिला चेहऱ्याचे सौदर्य वाढवण्यासाठी विविध प्रकारचा मेकअप करतात हे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे. प्रत्येक महिलेच्या मेकअप किटमध्ये विविध गोष्टी असतात. त्यात लिपस्टिकचाही समावेश असतो. (How Lipstick Make)

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

एखाद्या महिलेला मेकअपची फारशी आवड नसली तरी, तिच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक सापडतेच. आज बाजारात लिपस्टिकच्या अनेक प्रकारच्या शेड्स उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांना ही लिलस्टिक नेमकी कशी बनते हे माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला लिपस्टीकची निर्मिती कशी होते आणि त्यासंबंधी काही मजेदार तथ्य्यांबद्दल सांगणार आहोत.

लिपस्टिकमध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या जातात?

लिपस्टिक तयार करण्यासाठी तेल, मेण, पिगमेंट्स, फ्रॅग्रेंस यासह अनेक गोष्टींचा वापर केला जातो. लिपस्टिकच्या दीर्घायुष्यासाठी यात अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह आणि अल्कोहोलसह अनेक गोष्टींचा वापर कंपन्यांकडून केला जातो, परंतु या सर्वांची माहिती सार्वजनिक केली जात नाही.

कशी तयार केली जाते लिपस्टिक?

लिपस्टिकची निर्मिती करतान यामध्ये सर्वप्रथम पिगमेंट्स मिसळली जातात. पिगमेंट्सच्या मदतीने विविध रंग आणि शेड्स तयार केल्या जातात. या मिश्रणात तेल आणि पिगमेंट्स 2 : 1 च्या प्रमाणात असतात.

मोल्डिंग प्रक्रिया

वरील प्रक्रियेनंतर एका विशिष्ट तापमानात मोल्डिंगची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते वेगाने थंड केले जाते. मोल्डिंग प्रकियेदरम्यान या मिश्रणात कोणत्याही प्रकारची हवा जाणार नाही याची दक्षता घेतली जाते. थंड झाल्यानंतर ते थंड करून त्याच्या काड्या बनविल्या जातात. त्यानंतर फिनिशिंगचे काम करून ते पॅक करून बाजारात विकले जाते.

पहिली व्यावसायिक लिपस्टिक

लिपस्टिकचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. पूर्वीच्या स्त्रिया दगड फोडून त्याच्या रंगापासून ओठ रंगवत असत. त्यानंतर पहिली व्यावयायिक लिपस्टिक विक्रीसाठी म्हणून 1884 मध्ये फ्रेंच ब्रँड गुर्लेनने बनविली होती. आता हा ब्रँड जगातील सर्वात महाग लिपस्टिक बनवण्यासाठी ओळखला जातो.

लिपस्टिक निर्मितीसाठी केला जातो प्राण्यांचा वापर

प्राचीन काळापासून, लिपस्टिक तयार करण्यासाठी प्राणी आणि कीटकांच्या शरीराच्या विविध अवयवांचा वापर केला जात आहे. मात्र, आता अनेक कंपन्या वेगन उत्पादने बनवण्यावर भर देत आहेत. अनेक ब्रँड्सकडून व्हेगन लिपस्टिक आणि मेकअप उत्पादने बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु बाजारातील अनेक मेकअपच्या उत्पादनांमध्ये प्राण्यांच्या त्वचेपासून इतर अवयवांपर्यंतचा वापर केला जातो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT