फॅब्रिक ज्वेलरी Esakal
लाइफस्टाइल

नेहमीच्या दागिन्यांना कंटाळलात? मग ट्राय करा Fabric Jewlery

सध्या ज्वेलरी डिझायनिंगमध्ये फॅब्रिक ज्वेलरीचा नवा प्रयोग केला जात आहे. सोने, चांदी, मेटल, तांबे यांच्याही पलीकडे जाऊन फॅब्रिक ज्वेलरीला आजकाल पसंती दिली जाते

सकाळ डिजिटल टीम

वेगळ्या प्रकारचे दागिने ट्राय करायचे असतील तर फॅब्रिक ज्वेलरीचा उपयोग होतो. यामध्ये मूळ डिझाईन कापडापासून Designer Cloth तयार करून त्यावर कुंदन, जरदोसी, बीट्स, सीक्विन यांच्या साहाय्याने कलाकुसर केलेली असते. Fashion and Tips Marathi try this Fabric jewelry Fashion

तरुणाईला नवनवीन दागिने jewelry सतत खुणावत असतात. नेहमीचे दागिने घालून कंटाळलेल्या तरुणी नावीन्याच्या शोधात असतात. अशा वेळी त्यांना फॅब्रिक ज्वेलरीचा Fabric jewelry उपयोग होऊ शकतो.

सध्या ज्वेलरी डिझायनिंगमध्ये फॅब्रिक ज्वेलरीचा नवा प्रयोग केला जात आहे. सोने, चांदी, मेटल, तांबे यांच्याही पलीकडे जाऊन फॅब्रिक ज्वेलरीला आजकाल पसंती दिली जाते.

फॅब्रिक ज्वेलरीअंतर्गत कपड्यांना दागिन्यांचा आकार दिला जातो. त्यासाठी बनारसी, रेशमी, सिल्क अशा प्रकारच्या कापडांचा समावेश केला जातो. बूटिक आणि स्क्रीन प्रिंटच्या साहाय्याने ज्वेलरीचे सौंदर्य खुलवले जाते. फॅब्रिक ज्वेलरीला पारंपरिक आणि आधुनिक टच देण्याचा प्रयत्न केला जातो. दागिन्यांची उत्सुकता असलेल्या तरुणी या हटके स्टाईलचा सहज अवलंब करू शकतात.

हे देखिल वाचा-

ऑफिसला जायचे असो किंवा पार्टीला, हे दागिने पेहरावाची शोभा शतपटींनी वाढवतात. फॅब्रिक ज्वेलरीमध्ये रेशम, बनारसी सिल्क अशा मटेरियलचा वापर करून दागिने बनवले जातात. त्यावर कुंदन, मोती, स्टोन्स, जरदोसी, माणिक, चांदी, सोने इत्यादींच्या साहाय्याने नक्षीकाम आणि कलाकुसर केली जाते.

त्याचप्रमाणे लेस, सेंटिन आणि मलमलचाही वापर केला जातो. कपड्यांना हवा तो आकार देऊन, त्यामध्ये मोती गुंफून नेकलेस, बाजूबंद, ब्रेसलेट असे दागिने तयार केले जातात.

पारंपरिक बनारसी, कांजीवरम साडीवर फॅब्रिक ज्वेलरी उठून दिसते. याआधी चित्रपटांमध्ये फॅब्रिक ज्वेलरीचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा. आता सामान्य तरुणीही या दागिन्यांचा सर्रास वापर करताना दिसतात.

फॅब्रिक ज्वेलरीमध्ये वेगवेगळी व्हरायटी दर्जानुसार उपलब्ध असते. स्थानिक विक्रेत्यांकडे माफक किमतीत; तर मॉल्समध्ये जास्त किमतीची ब्रँडेड फॅब्रिक ज्वेलरी उपलब्ध असते. ब्रँडेड फॅब्रिक ज्वेलरीची किंमतही खिशाला परवडणारी असल्याने खरेदी करताना फारसा विचार करावा लागत नाही. पारंपरिक बनारसी, जामा वर्क, कांजीवरम याशिवाय जॉर्जेट, प्रिंटेड कॉटन, जूट, शिफॉन, टिश्यू, ऑरगेंजा इत्यादी मटेरियल्सचाही दागिन्यांमध्ये वापर केला जातो.

कारण, या प्रकारच्या कापडापासून दागिने तयार करणे तुलनेने सोपे असते. काही प्रकारची फॅब्रिक ज्वेलरी तयार करण्यासाठी मशिन्सचा वापर केला जातो; तर काही दागिन्यांमध्ये हाताने कलाकुसर केलेली असते. कपड्यांबरोबर क्रोशियापासून बनवलेले, बीट्स लावलेले दागिने व्यक्तिमत्त्व उठावदार करतात. त्यामुळेच फॅब्रिक ज्वेलरीच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे दागिने मिळवण्याचा आनंद मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT