Women Fashion sakal
लाइफस्टाइल

Women Fashion Tips: लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

सध्या ट्रेडीशनल ड्रेसेस मध्ये लॉन्ग फ्रॉक घालण्याची फॅशन सुरूच आहे

Aishwarya Musale

८ ते १० वर्षांपुर्वी अनारकली ड्रेसेसची फॅशन आली होती. एखादी फॅशन येते, वर्ष- दोन वर्ष असते आणि त्यानंतर पुन्हा बदलते. पण अनारकली ड्रेसबाबत मात्र तसं झालं नाही. हे ड्रेस अजूनही ट्रेंडमध्येच आहेत.

एवढी वर्ष ट्रेंडमध्येच असणाऱ्या काही मोजक्या कपड्यांपैकी एक आहे आता अनारकली ड्रेस या पद्धतीचा ड्रेस एवढा लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे अगदी लग्नसमारंभापासून ते एखाद्या छोटेखानी पार्टीपर्यंत अगदी कुठेही तुम्ही हा ड्रेस घालू शकता..

अशात आता अनारकली मध्ये खूप प्रकार आलेले आहेत, त्यात आपण नक्की कोणत्या पद्धतीचा अनारकली सूट घ्यावा किंवा शिवावा याच थोडसं कन्फ्युजन होतच असेल, त्यामुळे तुम्ही या स्टाईलचे ड्रेसेस घेऊ शकतात.

1. डिजायनर एथेनिक अनारकली सूट

सर्वात सुंदर आणि बहुदा खऱ्या अनारकलीचा लुक देणारा हा प्रकार आहे. सुरुवातीला अनारकली ड्रेसेस हे फक्त लग्नसमारंभासाठी किंवा पार्टी साठी घातले जायचे तेव्हा हा लुक खूप रॉयल दिसत होता. तुम्हीही तुमच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी हा ड्रेस घालू शकतात.

2. शॉर्ट अनारकली ड्रेस

हा ड्रेस गुडघ्यांपर्यंत येतो, याच्या खाली तुम्ही प्लाजो किंवा स्कर्ट घालू शकतात. जर तुम्हाला पायघोळ अनारकली ड्रेस आवडत नसेल तर ड्रेस तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

3. अनारकली फ्रॉक स्टाईल ड्रेस

सध्या ट्रेडीशनल ड्रेसेस मध्ये लॉन्ग फ्रॉक घालण्याची फॅशन सुरूच आहे, अशात तुम्ही वन पीस सारखे अनारकली ड्रेसेस घेऊ शकतात. हे दिसायलाही सुंदर आणि फॅशनेबल दिसतील.

4. जॅकेट स्टाईल अनारकली ड्रेस

सध्या जॅकेटची सुद्धा खूप स्टाईल सुरू आहे, आणि बाजारात तुम्हाला नक्कीच सुंदर जॅकेट स्टाईल अनारकली ड्रेस बघायला मिळतील, हे अगदी तुमच्या रेग्युलर किंवा ऑफिस लुक साठी परफेक्ट आहेत.

5. सिंपल अनारकली ड्रेस

जर तुम्हाला असे झगमगित ड्रेसेस आवडत नसतील तर तुम्ही हे सिंपल अनारकली ड्रेसेस घेऊ शकतात, हे तुमच्या ऑफिस लुकसाठी परफेक्ट आहेत आणि दिसायलाही सुंदर दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT