Father's Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Father's Day 2024 : पापा मेरी जान.! वडिलांसोबतचे नाते असे करा घट्ट, जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

Father's Day 2024 : उद्या (१६ जून) 'फादर्स डे' जगभरात साजरा केला जाणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Father's Day 2024 : आजकाल सगळ्यांचे जीवन हे धकाधकीचे झाले आहे. रोजचे कामाचे व्यस्त शेड्यूल, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या व्यस्त शेड्यूलमुळे लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना पुरेसा वेळ देता येत नाही.

आपले आई-वडिल, पत्नी आणि मुले यांना पुरेसा वेळ देणे अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या पालकांना पुरेसा वेळ देत नसाल तर, त्याचा तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. परंतु, या परिस्थितीमध्ये आई-वडिल जरी आपल्यावर रागावले असतील तरी त्यांचे आपल्यावरील प्रेम कधीच कमी होत नाही.

परंतु, कधीकधी मोठी झालेली मुले आपल्या वडिलांवर छोट्या गोष्टींवरून रागावतात. अशा परिस्थितीमध्ये वडिलांच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये अंतर निर्माण होऊ लागते. जर तुम्हाला तुमच्या वडिलांसोबतचे अंतर कमी करून नाते आणखी घट्ट करायचे असेल तर, या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

उद्या (१६ जून) 'फादर्स डे' जगभरात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला वडिलांसोबतचे नाते घट्ट करण्यासाठी खास टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या टिप्स.

वडिलांचे म्हणणे ऐकून घ्या

आपण लहान असतो, तेव्हा आपल्या आई-वडिलांचे म्हणणे आपण ऐकतो. परंतु, जशी मुले मोठी होऊ लागतात तेव्हा आपल्याच मनाचे खरे करू लागतात. अशा परिस्थितीमध्ये मुले आपल्या आई-वडिलांचे म्हणणे ऐकत नाहीत. त्यामुळे, आई-वडिलांना याचे वाईट वाटू शकते आणि नात्यांवर परिणाम होऊ शकतो.

तसेच, मुलाचे-मुलीचे आणि वडिलांचे विचार पटले नाही की मग याने विनाकारण वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, या गोष्टी टाळण्यासाठी वडिलांचे म्हणणे नीट ऐकून घ्या आणि तुमचा मुद्दा ही त्यांना तितक्याच प्रेमाने समजून सांगा. यामुळे, तुमच्यातील नाते आणखी घट्ट होईल.

वडिलांची मदत करायला तयार राहा

तुमचे वडिल जर कोणत्या कठीण परिस्थितीतून जात असतील तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. बाप नेहमी आपल्या मुलांची प्रत्येक छोटी-मोठी गरज पूर्ण करतो. त्यामुळे, त्यांना ही काही कमी पडता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी. आई-वडिलांना नेहमी मदत करा आणि तुमचे नाते आणखी मजबूत करा.

चांगले मित्र बना

जर तुम्हाला तुमच्या वडिलांचे चांगले मित्र व्हायचे असेल तर, त्यांच्या आयुष्याशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांचे प्रॉब्लेम्स सोबत शेअर करा.

भविष्यात काय करायचे आहे? किंवा करिअरबद्दल काय प्लॅनिंग आहे? या गोष्टी मुला-मुलींनी वडिलांसोबत जरूर शेअर कराव्यात. तसेच वडिलांना काही अडचणी येत असतील तर, त्यांच्याशी मोकळा संवाद साधा. यामुळे, तुमचे आणि वडिलांचे नाते आणखी घट्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT