Father’s Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Father’s Day 2024 : 'फादर्स डे' निमित्त वडिलांसोबत घालवा अविस्मरणीय क्षण, प्लॅन करा 'या' स्पेशल अ‍ॅक्टिव्हिटी

Father’s Day 2024 : जगभरात दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Father’s Day 2024 : अनेकदा आपण नेहमीच आईच्या बलिदानाबद्दल बोलतो. तिच्या त्यागाबद्दल आणि प्रेमाबद्दल चर्चा करतो. हे सर्व खरे असले तरी आईसोबत बाप तितकाच आपल्या मुलांसाठी झटत असतो. वरून कडक शिस्तीचा आणि टोमणे देणारा बाप आतून आपल्या मुलांना तितकाच जीव लावतो. वडिलांच्या या स्वभावामागे दडलेले प्रेम आणि काळजी समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

आपण जसे मोठे होतो, तसे आपल्याला वडिलांनी लावलेली कडक शिस्त आणि त्यांचे टोमणे आठवल्यावर कळते की, वडिल तर हे सर्व आपल्या भल्यासाठीच करत होते. तथापी, मोठे झाल्यानंतर मुली आवर्जून आपल्या वडिलांबद्दलचे प्रेम दाखवतात. परंतु, मुलांना थोडाफर संकोच वाटतो.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खास फादर्स डे निमित्त तुमचे वडिलांप्रतीचे प्रेम आणि नाते आणखी घट्ट करू शकता. जगभरात दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज या फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांसोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकता. त्या संदर्भातल्या काही अ‍ॅक्टिव्हिटीज आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वडिलांसोबत जा फिरायला

आज फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांसोबत मस्त फिरायला जाऊ शकता. तुम्ही ज्या परिसरात राहता, तेथून जवळ असलेल्या छोट्या-मोठ्या पर्यटनस्थळी तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. प्रवासामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि वडिलांना ही त्यांच्या दैनंदिन कामातून थोडासा ब्रेक घेता येईल.

डिनर प्लॅन करा

फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांसोबत मस्त डिनर प्लॅन करू शकता. आजच्या या खास दिवसानिमित्त तुम्ही वडिलांच्या एखाद्या आवडत्या हॉटेलला जेवायला जाऊ शकता. तसेच, वडिलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवून त्यांना खाऊ घालू शकता. यानिमित्ताने तुमचे संपूर्ण कुटुंब एकत्र येईल आणि तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल.

सोबत चित्रपट पाहा

वडिल-मुलांच्या नात्यावर आधारित असलेले असे अनेक चित्रपट आहेत. हॉलिवूड, बॉलिवूड, मराठी, मल्याळम, कन्नड अशा कितीतरी भाषांमधील चित्रपटांमध्ये वडिल-मुलाचे सुंदर नाते दाखवण्यात आले आहे. तुम्ही असे काही चित्रपट वडिलांसोबत बसून पाहू शकता.

या व्यतिरिक्त तुमच्या वडिलांच्या आवडीचे चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता. यासाठी तुम्ही वडिलांच्या आवडीच्या स्नॅक्सची देखील व्यवस्था करू शकता. यामुळे, वडिलांना छान वाटेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवताना तुमचे नाते आणखी घट्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT