Father’s Day 2024  esakal
लाइफस्टाइल

Father’s Day 2024 : वडीलांवर असलेलं प्रेम व्यक्त करा, या शुभेच्छांनी त्यांचा दिवस स्पेशल बनवा

बाबासाठी असलेल्या आदरयुक्त भितीमुळे आजचा दिवस साजरा करायची इच्छा असली तरी करता येत नाही

सकाळ डिजिटल टीम

Father’s Day 2024 :

आईवरच प्रेम लोक सहज व्यक्त करतात. पण, बाबावरील प्रेम व्यक्त करायला अनेक वर्ष जावी लागतात. काही मुलं तर त्यांना मुलं झाली तरीही बाबाला घाबरतात. एक प्रकारची आदरयुक्त भिती असते बाबाबद्दल. बाबा कणखर, रागीट असला तरी तो हवा असतो. कारण, बाबा असेल तरच घराला घरपण असतं. त्याच्या धाकातील प्रेम अफाट असतं.

आज १६ जून फादर्स डे आहे. बाबावर प्रेम करण्याचा आजचा दिवस होय. तुम्ही दूरवर शिकत असाल किंवा नोकरी करत असाल आणि काही कारणास्तव त्याला भेटता येत नसेल, तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला फादर्स डेनिमित्त शुभेच्छांचा संदेश पाठवू शकता. तुम्ही तुमच्या वडिलांना व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर कोट्स, मॅसेज पाठवू शकता. (Fathers Day wishes in marathi)

मागील महिन्यात मदर्स डे झाला. तेव्हा आईसाठी प्रत्येकाने काही ना काही केले. बाबासाठी असलेली आदरयुक्त भिती तो दिवस मनात असला तरी साजरा करता येत नाही. पण तुम्ही बाबांना फादर्स डेच्या शुभेच्छा देऊ शकता.

सगळे साथ सोडतात

तेव्हा एक व्यक्ती सोबत असते

ती म्हणजे बाप

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या कुटुंबासाठी जगणारा

सर्वांची काळजी करणारा

सर्वात महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे बाबा

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

आई असते मधासारखी मधाळ

बाबा असतो फसणासारखा,

वरून कठीण अन् आतून रसाळ

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

जगात कुणीही नसलं तरी चालेल

पण बाबाची साथ नेहमी असावी

कशाचीच कमी पडत नाही

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्य खूप मोठं असलं

तरी चिंता खूप आहेत

पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे

म्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे

फादर्स डेच्या शुभेच्छा!

जिनके सिर पर पिता का होता है हाथ
वो ही इस दुनिया में होते हैं नसीब वाले
सभी ख्वाहिशें होती हैं पूरी उनकी
जिनके भाग्य में होता है पिता का साथ.
फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

घराच्या दारात असलेली बापाची चप्पल

घरात येणाऱ्या प्रत्येकाला वेगळाच पाठींबा देते

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

आईचं प्रेम सर्वांना दिसत

तर बाबाच लपून जातं,

त्यानं तुमच्यासाठी केलेल्या कष्टासारखं

अन् त्याच्या डोळ्यातील आसवासारखं

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

आई रडू शकते, बाबा नाही

त्यामुळे तुमच्या लाडक्या बाबाला

कधीच दुखावू नका

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

ईश्वर ने नवाजा है मुझे जिस कीमती तोहफे से

वह अनमोल तोहफा कोई और नहीं

बल्कि सबसे प्यारे मेरे पापा हैं

जिनकी तरह दुनिया भर में कोई और नहीं.

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT