Google Doodle Honors the Nurturing Role of Fathers sakal
लाइफस्टाइल

Father's Day 2025: फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल; ‘ज्यांनी आपल्याला घडवलं’ त्यांना सलाम!

Google Doodle for Father’s Day 2025: फादर्स डे २०२५ निमित्त गुगलने ‘ज्यांनी आपल्याला घडवलं’ अशा वडिलांना सलाम करत खास डूडल साकारलं.

Anushka Tapshalkar

Meaning behind 2025 Father’s Day Google Doodle: दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 15 जून रोजी साजरा केला म्हणजेच आज साजरा केला जात आहे. आपल्या आयुष्यातील पहिले आदर्श असणाऱ्या वडिलांचे प्रेम, त्याग, मार्गदर्शन आणि पाठिंबा यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास दिवस आहे. जे फक्त आपले पालनपोषण करत नाहीत, तर संकटांमध्ये खंबीरपणे उभे राहतात आणि आयुष्यभर आपल्यासाठी आधारस्तंभ ठरतात, अशा वडिलांना या दिवशी खास आभार मानले जातात. असेच खास आभार गुगलने देखील मानले आहेत.

फादर्स डे स्पेशल गुगल डुडल

जगभरातल्या सगळ्या वडिलांच्या प्रेम, मार्गदर्शन आणि त्यागाला मान देत गूगलने फादर्स डे निमित्त आपल्या डुडलच्या माध्यमातून वडिलांना एक खास अभिवादन केले आहे. “Thank you to all of the dads who helped us grow” म्हणजेच “आपल्याला घडवणाऱ्या सर्व वडिलांचे आभार” असा खास संदेश या डूडलमधून दिला आहे. गूगलच्या "G" या अक्षरावर एक छोटा हिरवा अंकुर दाखवलेला आहे, जो वाढ, नातं आणि वडिलांच्या मदतीने घडणाऱ्या आयुष्याचं प्रतीक आहे. हे डिझाइन खूप साधं, पण भावनांनी भरलेलं असून वडिलांच्या भूमिकेचं महत्त्व सोप्या पद्धतीने सांगतं

कलाकृतीमागील कलाकार व तंत्र

हे सुंदर डुडल गुगल डुडलर ओलिव्हिया व्हेन यांनी साकारलं असून, यात स्टॉप मोशन तंत्र आणि डिजिटल पेंटिंग या दोन्हींचा समावेश आहे. त्यांनी ही कलाकृती वडिलांचा जसा प्रेमळ आणि आधार देणारा स्वभाव आहे, तशीच उलगडणारी बनवली आहे. या रचनेतून वडिलांचं व्यक्तिमत्व, त्यांची निःस्वार्थ माया आणि आपल्या जीवनावर असलेला प्रभाव सहज दिसून येतो.

बऱ्याच जणांनीहे डुडल पाहण्याचा प्रयत्न केला पण भारतात हे डुडल दिसत नाही. तरीही, गुगलने बनवलेलं हे अनोखं अभिवादन वडिलांबद्दल असलेल्या प्रेमभावनेचा एक सुंदर आविष्कार ठरलं आहे.

तुम्हाला हे डुडल पाहायचे असेल तर या लिंक वर क्लिक करुन तुम्ही ते पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT