fiber
fiber  esakal
लाइफस्टाइल

हार्ट अटॅकचा धोका कमी करतात 'या' फायबर युक्त गोष्टी!

सकाळ डिजिटल टीम

आजच्या धकाधकीच्या जीवनात हृदय निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. आजकालची बदलती जीवनशैली तसेच मानसिक ताणताणावामुळे ह्रदयविकार तसेच स्ट्रोकचा (heart attack) धोका मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची चिन्हे दिसतात. यासाठी चांगले आरोग्य राहावे यासाठी आपल्या आहारात फायबरचा (fiber-rich foods) समावेश करायला हवा. कारण हाच फायबर युक्त आहार बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करतो. यामुळे पचन संबंधित समस्या टाळता येतात. अनेक पाचन फायद्यांव्यतिरिक्त आपल्या आहारात उच्च फायबर (rainy season diet) घेतल्याने वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. हे हे हार्ट अटॅक तसेच स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. आपल्या आहारात कोणते फायबर युक्त पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया. (Include these fiber-rich foods in the rainy season diet)

ओट्स – ओट्स फायबरच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक मानले जाते. स्वादिष्ट नाश्ता म्हणून तुम्ही ओट्स सेवन करू शकता.

सफरचंद – सफरचंद फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. इतर फळांच्या तुलनेत सालेमध्ये जास्त फायबर असते. आपण ते अनेक प्रकारे वापरू शकता. आपण त्यातून चाट देखील बनवू शकता.

मसूर – मसूर हा प्रोटीनसाठी समृद्ध स्त्रोत आहे. परंतु त्यात फायबरचे प्रमाणही जास्त आहे. मसूर आणि कार्बोहायड्रेट्समध्ये मिळणारे आहारातील फायबर तुमची ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत करतात. हे तुमचे मन आणि शरीर दिवसभर सक्रिय ठेवते.

सुका मेवा – बदामापासून अक्रोड आणि काजू पर्यंत सर्व प्रकारच्या सुक्या मेव्यामध्ये फायबर भरपूर असतात. सकाळी एक वाटी सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. विविध खाद्यपदार्थांमध्ये आपण बदाम, अक्रोडचा समावेश करू शकतो.

ब्रोकोली – ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी तसेच फायबर भरपूर प्रमाणात असते. ही चवदार भाजी फक्त थोडे तेल आणि लसूण घालून तयार केली जाऊ शकते. तुम्ही त्यापासून पराठे देखील बनवू शकता.

केळी – केळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. हे पोटॅशियम आणि लोहाचे समृद्ध स्रोत आहे. केळीपासून अनेक प्रकारचे ज्यूस आपण तयार करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT