Flight mode google
लाइफस्टाइल

Flight mode : विमानात बसल्यावर फोन फ्लाइट मोडवर ठेवला नाही तर हा धोका संभवतो

फ्लाइट मोडचा पर्याय सर्व फोनमध्ये दिलेला असते. फ्लाईट मोड चालू होताच फोनचे नेटवर्क बंद होते.

नमिता धुरी

मुंबई : जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो तेव्हा प्रवास सुरू करण्यापूर्वी फ्लाइट अटेंडंटकडून काही मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात. यामध्ये मोबाईल फोन बंद करणे किंवा फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना महत्त्वाची आहे. फ्लाइट मोडचा पर्याय सर्व फोनमध्ये दिलेला असते. फ्लाईट मोड चालू होताच फोनचे नेटवर्क बंद होते.

हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच येतो की फ्लाइटमध्ये फोन का बंद करण्यास सांगितले जाते. जर कोणी हे केले नाही तर काय होईल याची कल्पना करा. आज आपण फ्लाइट मोड म्हणजे काय आणि विमानात ते चालू न केल्यास काय होऊ शकते हे जाणून घेऊ.

फ्लाइट मोड म्हणजे काय ?

'फ्लाइट मोड'चा मोबाइल फोनमध्ये पर्याय आहे. यामध्ये, फोन नेटवर्कच्या बाहेर जातो आणि बंदही होत नाही. तुम्ही फोन फ्लाइट मोडमध्ये वापरू शकता परंतु नेटवर्कशी संबंधित काम जसे की कॉलिंग आणि इंटरनेट वापरू शकत नाही.

फ्लाइट मोड चालू केल्यानंतर, कोणीही चित्रपट आणि व्हिडिओ पाहू शकतो, संगीत ऐकू शकतो आणि गेम खेळू शकतो. त्याचबरोबर काही मोबाईलमध्ये वायफाय आणि ब्लूटूथचाही वापर करता येतो.

विमानात फ्लाइट मोड चालू करण्यास का सांगितले जाते ?

विमानात फ्लाइट मोड चालू नसल्यास मोबाईल फोनच्या सिग्नलचा विमानाच्या संपर्क यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विमान उडवणाऱ्या वैमानिकाशी संवाद साधण्यात अडचणी येऊ शकतात.

विमान उड्डाण दरम्यान पायलट नेहमी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतात. फोनचे नेटवर्क सुरू राहिल्यास पायलटला स्पष्टपणे माहिती मिळत नाही. रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे विमानात प्रवास करताना फ्लाइट मोड नेहमी चालू ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT