flighting with partner then say sorry in this way 
लाइफस्टाइल

तुमच्या पार्टनरसोबत तुमचं भांडण झालंय? तर 'या' ट्रिक्सने बोला सॉरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपण नेहमीच आजूबाजूला ऐकत आणि पाहत आलोय. नातं कोणतंही असूदेत त्या नात्यात थोडं तरी भांडण होत असतातच. बरेचदा इच्छा असू किंवा  नसूनही पार्टनरसोबत भांडण होतात आणि नंतर दोन्ही बाजूंनी सॉरी कोणत्या पद्धतीने बोलायचं याचा विचार केला जातो.

कधीकधी सॉरी बोलण्यासाठी योग्य शब्दांची निवड करणे ही त्या पार्टनरला अवघड होऊन बसते. योग्य वेळी आणि योग्य शब्दांनी सॉरी बोलण्याने नात्यातला अबोला संपतो. जर भांडणानंतर आपला पार्टनरदेखील आपल्यावर नाराज असेल आणि आपण त्याला समजावण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी काही खास टिप्स आहेत, चला तर मग कोणत्या आहेत या टिप्स ते जाणून घेऊयात. 

पार्टनरला व्हॅल्यू द्या

जेव्हा तुम्ही एखाद्या तणावाखाली असाल त्यावेळी तुमच्या पार्टनरला विचारा की, या तणावग्रस्त वातावरणाला सुधारण्यासाठी मी काय करावे? यामुळे तुमच्या पार्टनरला समजेल की आपण त्याला व्हॅल्यू दिले आहे. हे केवळ तणाव कमी करण्यातच नव्हे तर हृदयाला हलके करण्यास मदत करेल. एकमेकांना त्याचे  व्हॅल्यू वाटणे महत्वाचे आहे.

भांडणाबद्दल दुसर्‍या दिवशी बोला

भांडण आणि वादानंतर वातावरण गरम होते, अशा परिस्थितीत दोन्ही पार्टनरनी एकाच वेळी भांडणाचा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे तुमच्यात अधिक ताण येऊ शकतो. जे काही झाले ते दुसर्‍या दिवसासाठी चर्चा करण्यासाठी सोडून द्या. तोपर्यंत वातावरण शांत होते आणि बोलणे सोपे होते.

भावनांना समजून घ्या

भांडणानंतर पार्टनरची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. भांडण संपवण्यासाठी तुम्ही म्हणू शकता की, मी तुझ्या भावनांचे कौतुक करते किंवा करतो. तुमच्या पार्टनरला हे देखील समजेल की तुमच्यावतीने मी तणावपूर्ण परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

सॉरी म्हणा
 

कोणतेही भांडण संपवण्यासाठी सॉरी हा शब्द सर्वोत्कृष्ट मानला जातो. नेहमीच आपली चूक मान्य करून सॉरी म्हणा, मी चूक केली आहे, माझा हेतू तुला किंवा तुम्हाला दुखावण्याचा नव्हता. जर तुम्ही मनापासून सॉरी बोल्यास कोणत्याही व्यक्तीचा राग शांत होऊ शकतो. प्रामाणिकपणे हे केल्याने तुमच्या पार्टनरला आनंद वाटेल.

वचन द्या

तुमच्या पार्टनरला तुम्ही केलेल्या चुकांवर सुधारणा करण्याचे वचन देऊ शकता. त्यांना सांगा की मी केलेली चूक पुन्हा होणार नाही. माझ्या चुका सुधारण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन किंवा करीन. यामुळे लवकरच एकमेकांमधील वाद संपविण्यात मदत होईल. चूक सुधारण्याचे वचन देऊन त्यावर सुधारणा करणे महत्वाचे आहे.

संपादन : सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT