Flipkart Big Bachat Dhamaal Sale 
लाइफस्टाइल

Flipkart बिग बजेट धमाल सेल होणार उद्यापासून सुरू, मिळणार बंपर सूट

स्मार्टफोन, टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Big Bachat Dhamaal Sale : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टचा (Flipkart) उद्यापासून महाबचत सेल सुरू होणार आहे. ४ ते ६ मार्च दरम्यान ऑनलाईन चालणाऱ्या या सेलमधून ग्राहकांना भरपूर फायदा होणार असल्याने चांगली शॉपिंग (Shopping) करता येणार आहे. तसेच सेलमध्ये दररोज दुपारी १२, सकाळी ८ आणि संध्याकाळी ४ वाजता कॉम्बो ऑफरसह नवीन सर्वोत्तम डील्स ग्राहकांना मिळणार आहेत. या सेलदरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन, टीव्ही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. (Flipkart Big Bachat Dhamaal Sale)

Flipcart sale

या फोन्सवर भारी सूट

सेलदरम्यान Motorola Edge 30 Pro आणि Realme 9 Pro यासारखे मोबाइल लॉंच होणार असून त्यांची विक्री सुरू होईल. तर iPhone 12 सीरीजवर आकर्षक डिल्स मिळणार आहेत. सेलदरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्के सूट मिळेल तर टिव्हीवर 75 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. तसेच ग्राहकांना बँक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय पर्यायही मिळणार आहे.

डिस्काऊंट आणि नो कॉस्ट इएमआयचा फायदा

या सेलमध्ये ग्राहकांना बँक कार्ड डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा मिळणार आहे. तर, UPI व्यवहारांवर 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ग्राहकांनी पेमेंटसाठी IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड आणि येस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास, 10 टक्के सूट दिली जाईल. त्याचबरोबर नो कॉस्ट इएमआय प्लॅन, जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवरील डीलही मिळणार आहे. पण, फ्लिपकार्टने सर्व डीलची माहिती शेअर केलेली नाही. कंपनीने वेअरेबल, ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्स आणि गेम्सशी संबंधित डीलची घोषणा केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT