flying vadapav  
लाइफस्टाइल

Viral : फ्लाइंग वडापाव म्हणजे काय रे भाऊ? मुंबईच्या वडापाववाल्याची भन्नाट ट्रिक

शर्वरी जोशी

मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे दोन विषय कोणते? असा प्रश्न विचारला तर पटकन डोळ्यासमोर मुंबईची लोकल ट्रेन आणि वडापाव या दोनच गोष्टी समोर येतील. मुंबईची लोकल ट्रेन आज मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. तर, वडापाव हा मुंबईकरांच्या जीव की प्राण आहे. विशेष म्हणजे या वडापावची ख्याती पार सातासमुद्रापार पोहोचली आहे. त्यामुळे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रचं नव्हे तर आता विदेशातही वडापावची चव चाखायला मिळते. बटाट्याची झणझणीत भाजी आणि त्यावर बेसन पीठाचं खुसखुशीत आवरण असलेला वडापाव तोंडात टाकला की लगेच विरघळून जातो.परंतु, कालानुरुप वडापावच्या पद्धतीमध्ये आणि चवीमध्ये अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळतं. चीज वडापाव, मसाला वडापाव, शेजवान वडापाव असे अनेक विविध व्हरायटी वडापावमध्ये मिळू लागल्या आहेत. यामध्येच आता सोशल मीडियावर मुंबईतील फ्लाइंग वडापाव हा आगळावेगळा प्रकार चर्चेत आला आहे. सध्या या वडापावचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुंबईतील बोरा बाजार येथे तब्बल ६० वर्ष जुनं रघू डोसा वाला हा खाद्यपदार्थांचा स्टॉल असून तेथील फ्लाइंग वडापाव तुफान चर्चेत आला आहे.  आमची मुंबई नावाच्या एका फूड ब्लॉगर यूट्यूब चॅनेलवर या वडापावचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओमध्ये एक शेफ मसाला पाव तयार करुन त्यात फ्लाइंग वडा टाकून देत आहे. हा वडा, पावामध्ये घालण्यासाठी तो भन्नाट युक्ती वापरतांना दिसत आहे. या शेफने ताटातील वडा हवेत उडवून तो कॅच पकडला आणि त्यानंतर त्याने तो पावात घालून दिला. विशेष म्हणजे त्याची ही पद्धत वाखाणण्याजोगी आहे. कारण, अचूकरित्या तो वडे झेलून घेत आहे. 

दरम्यान, आतापर्यंत या व्हिडीओ २ लाख ७१ हजार ६५४ पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या स्टॉलवर प्रत्येक पदार्थ ४० रुपयांना मिळतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT