How to Ignore Toxic Boss:  Sakal
लाइफस्टाइल

Plan Your Workload: खडूस बॉससमोरही टेन्शन फ्री राहायचंय? फक्त फॉलो करा 'या' भन्नाट टिप्स

How to Ignore Toxic Boss: ऑफिसमध्ये बॉससोबत कोणत्याही निर्णयावर असहमत असल्यास आदरयुक्त शब्दांचा वापर करावा.

Puja Bonkile

How to Ignore Toxic Boss: सध्या अन्न, वस्तू याप्रमाणेच नोकरी हा महत्वाचा भाग बनवला आहे. कामाच्या ठिकाणी आपली कमागिरी उत्तम दिसण्यासाठी प्रत्येकाल खुप मेहनत घ्यावी लागते. कामाचे टार्गेट पुर्ण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यात ऑफिसचे वातावरण कसे आहे हे देखील महत्वाचे असते. अनेकांना खडूस बॉससह काम करावे लागते. ज्यामुळे मानसिक ताण वाढतो. तुम्हालाही अशा समस्येला समोर जावे लागत असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

प्रोफेशनल राहा

ऑफिसमध्ये बॉससोबत कोणत्याही निर्णयावर असहमत असल्यास आदरयुक्त शब्दांचा वापर करावा. तुमचे मत स्पष्टपणे बॉससमोर मांडावे.

बॉसने दिलेल्या कोणताही सल्ला वैयक्तिक घेऊ नका.

ऑफिसमध्ये काम करताना आपल्या कामावर लक्ष द्यावे. वैयक्तिक मतांकडे जास्त लक्ष देणे टाळावे. यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल.

तुमच्या सीमा निश्चित करा

ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा स्पष्टपणे समजून घ्यावे.

ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त कामांना नम्रपणे आणि स्पष्टपणे नकार द्यावा.

ऑफिसमध्ये वेळेत काम करण्यावर भर द्यावा.

परस्परसंवाद मर्यादित करा

ऑफिसमध्ये जेव्हा तुम्हाला खुपच आवश्यक काम आले असेल तेव्हाच बॉससोबत बोलावे.

बॉससोबत बोलताना नेहमी कामात यश कसे येईल आणि कामात काय सुधारणा असावी यावर संवाद साधावा.

बॉससोबत वैयक्तिक गोष्टींवर चर्चा करणे टाळावे.

कागदपत्रे नीट जपा

बॉससोबत झालेल्या मिटिंग आणि चर्चामधील सुचनांची नोंद ठेवावी.

तुम्हाला दिलेल्या सुचना आणि काम हे ईमेलद्वारे मिळाल्या आहेत ना याची नोंद ठेवा.

तुमच्या कामाचा मागोवा घेत राहावा.

ऑफिसमधील वर्तवणूक

ऑफिसमध्ये तुमच्या सहकार्यांशी चांगले संबंध असावे. वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहावे.

तुम्हाला बॉसची वागणूक त्रासदायक वाटत असेल तर HR किंवा Supervisor सोबत संबंधित विषयावर चर्चा करावी.

शांत राहा

ऑफिसमधील कामाचा तणाव किंवा बॉसच्या चिडचिडेपणाचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर दीर्घ श्वास घ्यावा आणि डोले बंद करून शांत बसावे. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी ५ मिनिटे वेळ काढून ध्यान करावे. तसेच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.

दुसरे पर्याय शोधा

तुम्हाला बॉसच्या चिडचिडेपणाचा अधिक त्रास होत असेल तर दुसरा पर्याय म्हणून दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधू शकता. ज्यामुळे तुमचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य निरोगी राहील.

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

तुमच्या बॉसबद्दल इतरांजवळ गॉसिप किंवा तक्रार करणे टाळा.

नेहमी समाधानी राहावे.

नेहमी कामावर लक्ष देऊन प्रगतीचा विचार करावा.

आवडते गाणं ऐकावे.

आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

नियमितपणे योगा करावा.

कामातून थोडा ब्रेक घेऊन ट्रिप प्लॅन करावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT