Relationship  sakal
लाइफस्टाइल

Relationship tips: रिलेशनशिपमध्ये असूनही एकटेपणा वाटतोय? मग या टीप्स करा फॉलो

नात्यात एकटेपणा जाणवण्याची कोणती कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया.

Aishwarya Musale

रिलेशनशिपमध्ये असताना आपल्याला आपल्या जोडीदारासोबतच नातं जपणं फार महत्त्वाचं आहे. पण अनेकदा असं होतं की आपल्याला आपल्याच पार्टनरसोबत एकटं वाटतं. आपल्याला कळतंच नाही की असं का होतं ते. परंतु यावर आपण आपल्या पार्टनरसोबत बोलण्यापेक्षा किंवा ही समस्या सोडवण्यापेक्षा अधिकच एकटे पडत जातो.

रिलेशनशिपमध्ये असताना जोडप्याला जोडीदाराची साथ मिळते. प्रेमळ जोडपे किंवा पती-पत्नीला एकमेकांच्या सोबतीमुळे एकटेपणा जाणवत नाहीत. पण बऱ्याच वेळा लोकांना नात्यात एकटेपणा आणि निराशा वाटू लागते. एकटेपणा वाढला की नाती पोकळ होऊ लागतात.

तुमच्या जोडीदाराप्रती तुमच्या भावना बदलू लागतात. लोक तणावग्रस्त होतात. नातेसंबंधात एकटेपणा जाणवणारे लोक स्वतःला विचारतात की ते त्यांच्या जोडीदारासोबत असतानाही त्यांना एकटे का वाटते.

हा दोष कोणाचा आणि एकटेपणा दूर करण्यासाठी काय करावे ? जर तुम्हीही एखाद्या नात्यात असाल पण तरीही एकटेपणा वाटत असेल तर त्याची कारणे आणि एकटेपणावर मात करण्यासाठी टिप्स जाणून घ्या.

नातेसंबंधात एकटेपणा जाणवण्याची कारणे

जोडीदाराकडून अपेक्षा

जेव्हा लोक त्यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा ठेवू लागतात परंतु ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, तेव्हा तुमची निराशा होते. जोडीदारावर जास्त अवलंबून राहणे आणि त्यांची उदासीनता तुम्हाला एकाकी बनवते.

भावनिकतेचा अभाव

जेव्हा नात्यात भावनिकतेचा अभाव असतो तेव्हा एकटेपणा जाणवतो. जर तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे भावनिक बंध चांगले नसेल तर तुम्ही एकमेकांना नीट समजून घेत नाही आणि नात्यात एकटेपणा वाढू लागतो.

वेळ देत नाही

काही वेळा व्यग्र जीवनशैलीमुळे लोक जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्यात फारशी चर्चा किंवा भेटीगाठी होत नाहीत. अशा परिस्थितीत जोडीदार आपल्या व्यग्र जोडीदाराची वाट पाहात असतो आणि स्वत:चा एकटा विचार करू लागतो. त्याला त्याच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असतो पण त्यांच्याकडे एकमेकांसाठी वेळ नसतो.

एकाकीपणावर मात करण्याचे मार्ग

नात्यात सर्व काही ठीक होत नसेल, तरच लोकांना एकटेपणा जाणवतो. जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराशी बोला आणि नातेसंबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

जोडीदारासोबत फिरायला जा. त्यांच्यासोबत थोडा वेळ एकांत घालवा. यामुळे एकटेपणा दूर होऊ शकतो. जर तुम्हाला नात्यात एकटेपणा वाटत असेल तर मित्रांशी किंवा जवळच्या व्यक्तीशी बोला आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT