health care sakal
लाइफस्टाइल

Heart Care News: तरुणांनी हृदयाची काळजी घेण्यासाठी फक्त या खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी जीवन जगा!

तरुणांनी हृदयाची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या

Aishwarya Musale

हल्ली वरचेवर व्यायाम करणाऱ्या अथवा अगदी फिट असणाऱ्या तरूणांनाही हार्ट अटॅक आल्याचे ऐकू येते. प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपडेला वेलकम टू द जंगल चित्रपटाच्या सेटवर हदयविकाराचा झटका आला अन् चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याला तातडीनं मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मनात प्रश्न पडतो की, तरूण वयात हार्ट अटॅक येण्याचं नक्की कारण काय आहे? विशीतील तरुणांनाही हृदयाच्या समस्या येऊ लागल्या आहेत. वयाच्या 20 व्या वर्षापासून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे हे तुमचे प्राधान्य असले पाहिजे. विशी ते चाळीशीदरम्यान तुमच्या हृदयाची नीट काळजी घेणे निरोगी भविष्याच्या पायाभरणीसाठी खूप उपयुक्त ठरते. अशात तुम्ही तुमच्या हृदयाची खास काळजी घेणं महत्वाचं आहे.

रक्तदाब कमी करा

रक्तदाब सर्वसामान्य पातळीपेक्षा थोडा जरी वाढला तरी नंतरच्या काळात हृदयाच्या समस्या उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे वर्षातून किमान एकदा स्वतःचा रक्तदाब तपासून घ्या. जर तुमचा रक्तदाब १२०/८० पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

कोलेस्टेरॉल कमी करा.

कोलेस्टेरॉल जास्त असेल तर हृदय विकारांचा धोका वाढतो. खूप जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कोलेस्टेरॉल वाढवतात. जीवनशैली आणि आहारामध्ये आरोग्यदायी बदल घडवून आणून कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवता येते. संतुलित आहार व शारीरिक व्यायाम याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणणे शक्य नसेल तर तुमचे डॉक्टर औषधे सुचवू शकतील.

धूम्रपान बंद करा

धुम्रपानामुळे फक्त फुफ्फुसांनाच नव्हे तर, हृदयाला देखील धोका निर्माण होतो. धुम्रपानामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला हृदय विकार होण्याचा धोका इतरांपेक्षा तीन ते चार पटींनी जास्त असतो. खूप उशीर होण्याआधीच धूम्रपान कायमचे बंद करा.

अति प्रमाणात बॉडी बिल्डिंग बंद करा

स्नायू बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेला आहार, पाणी कमी पिणे आणि रात्री उशिरा झोपणे या सर्व गोष्टी एकत्र आल्या की शरीराचे जैविक घड्याळ बिघडते व मेटॅबोलिजमवर परिणाम होतो. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स तयार होऊ लागतात आणि पुढे जाऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

ताणतणाव कमी करा

ताण वाढला तर रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी यामध्ये वाढ होते आणि हे दोन्ही घटक हृदय विकारांना आमंत्रण देणारे आहेत. व्यायाम, ध्यान, योगासने आणि नियमित झोप यांचा आपल्या दिनचर्येत समावेश करून तुम्ही ताणतणावांना दूर ठेवू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमचे हृदय निरोगी राखू शकाल.

झोप

रोजच्या रोज किमान ७ तास शांत झोप ही मेंदू व स्नायू यांचा शीण घालवून, ताणतणाव कमी करण्यासाठी व शरीर पुन्हा नव्याने ताजेतवाने होण्यासाठी आवश्यक असते.

कौटुंबिक पार्श्वभूमी

तुमच्या कुटुंबात आधी कोणाला हृदय विकार झालेला असेल तर वयाच्या २५व्या वर्षीपासून वर्षातून एकदा किंवा दोनदा हृदय विकारांसाठी जेनेटिक स्क्रीनिंग, ईसीजी आणि इकोकार्डिओग्राफी करवून घेतल्याने तुम्ही हृदय विकारांना येण्यापासून रोखू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT