Korean Girls Hair Tips
Korean Girls Hair Tips esakal
लाइफस्टाइल

Korean Girls Hair Tips : कोरियन मुलींसारखे सिल्की केस हवे असतील तर या टीप्स करा फॉलो

सकाळ डिजिटल टीम

Korean Girls Hair Tips : कोरियन मुलींच्या त्वचेप्रमाणेच त्यांचे मुलायम, सरळ आणि सिल्की केस पाहून सर्वांनाच अचंबा वाटतो. भारतातील मुलींना कोरियन मुलींच्या त्वचेचे आणि केसांच्या रूटीनचे वेड आहे. त्यांच्यासारखे केस मिळविण्यासाठी नक्की त्यांचे हेअर केअर रूटीन कसे आहे ते जाणून घ्यायला हवे.

कोरियन मुली आपल्या त्वचेप्रमाणेच केसांचीही विशेष काळजी घेतात आणि यासाठी केसांचे योग्य रूटीन फॉलोही करतात. तुम्हालाही Korean Girls प्रमाणे केस हवे असतील तर त्यांचे Hair Care Routine नक्की कसे आहे ते घ्या जाणून.

स्कॅल्पसाठी स्क्रब

केसांना कोरियन ब्युटी देण्यासाठी स्काल्पची स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. स्काल्पमधून कोंडा, धूळ आणि माती काढून टाकण्यासाठी केसांना स्क्रब करावे. कोरियन मुलींचा हा नियमित क्रम आहे.

हेअर पॅकचा वापर

केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांना मऊपणा देण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी हेअर पॅकचा वापर करावा. यासाठी अंडे, नारळाचे तेल, ऑर्गन ऑईल आणि Apple Cide व्हिनेगर एकत्र करून केसांना लावावे. हेअरपॅक केसांना कंडिशनिंग देऊन मऊ आणि मुलायम करण्यास मदत करतात.

Natural Wind For Hair

केस सुकविण्यासाठी कोरियन मुली या हेअर ड्रायरपेक्षा नैसर्गिक हवेचा वापर करतात. यामुळे केस निस्तेज होत नाहीत आणि केसांना कोरडेपणाही येत नाही. तसंच ड्रायर वापरायचाच असेल तर थंड हवेच्या ड्रायरचा वापर केला जातो.

दुहेरी केसांसाठी

जर केसांना फाटे फुटले असतील अथवा केस दुहेरी झाले असतील तर त्यासाठी तेलात पाणी मिक्स करून त्याचा स्प्रे केसांवर कोरियन मुली करतात. याचा नियमित वापर केल्याने केस मुलायम राहातात. पाण्याते २-३ थेंब मिक्स करून हे पाणी तुम्ही केसांवर स्प्रे करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

Kavya Maran KKR vs SRH : हैदराबादच्या मालकीणबाईंच्या डोळ्यात अश्रू तरी दाखवला दिलदारपणा; पाहा VIDEO

Delhi Fire News : विनापरवाना सुरु होतं दिल्लीतलं बेबी केअर हॉस्पिटल; चौकशीत आढळले अनेक गैरप्रकार

Shreyas Iyer : KKR च्या विजयाचं श्रेय श्रेयसचं की गौतमचं? चंद्रकांत पंडितांना विसरून कसं चालेल?

Heatwave : अबब! उन्हाचा पारा ५१ अंशांवर; पुढचे तीन ते चार दिवस रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT