Monsoon  sakal
लाइफस्टाइल

Monsoon Skin Problems: पावसाळ्यात लहान मुलांमध्ये उद्भवतायत त्वचेच्या समस्या? मग 'या' टिप्स फॉलो करा!

बदलत्या ऋतूमध्ये मुलांच्या आरोग्याचीही अधिक काळजी घ्यावी लागते.

Aishwarya Musale

बदलत्या ऋतूमध्ये मुलांच्या आरोग्याचीही अधिक काळजी घ्यावी लागते. या ऋतूमध्ये अनेक मुले ताप, संसर्ग किंवा सर्दी यांना लवकर बळी पडतात. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे अनेक मुलांना अशा आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते.

या ऋतूत अनेक मुले त्वचेच्या समस्यांनाही बळी पडतात. फंगल इंफेक्शन, घामोळे, ऍलर्जीक रिएक्शन, जिवाणू संसर्ग, खाज सुटणे आणि पुरळ उठणे यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्यांचा या ऋतूमध्ये सामना करावा लागतो.

बाळाची त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवा

मुलांनी आंघोळ केल्यानंतर शरीर व्यवस्थित कोरडे करा. विशेषत: जिथे खूप घाम येतो अशा ठिकाणी स्वच्छ करा.

माईल्ड क्लीन्सर

मुलांच्या त्वचेसाठी खूप हार्श किंवा केमिकल युक्त क्लीन्सर वापरू नका. असे क्लीन्सरने त्वचा ड्राय आणि इरिटेटिंग होऊ शकते. त्वचेसाठी माईल्ड क्लीन्सर वापरा.

हलके कपडे

मुलांना हलके फॅब्रिकचे कपडे घाला. तुम्ही त्यांना कॉटनचे कपडे देखील घालू शकता. या कपड्यांमध्ये हवा अगदी सहज जाते आणि घामही लवकर सुकतो. यासोबतच मुलांना अशा आउटफिट्समध्ये खूप कम्फर्टेबल वाटेल.

वातावरण कोरडे ठेवा

घरातील वातावरण कोरडे ठेवण्यासाठी तुम्ही डिह्युमिडिफायर वापरू शकता. हे बुरशीजन्य वाढ रोखण्यास मदत करेल.

वैयक्तिक गोष्टी शेअर करणे थांबवा

तुम्ही मुलांना टॉवेल, कपडे आणि वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका असे सांगा. मुलांनी त्यांच्या वैयक्तिक गोष्टी शेअर केल्यास संसर्गाचा धोका वाढतो.

स्वच्छता

पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. मुलांना हात धुण्याची सवय लावा. बाहेरून किंवा घरी आल्यानंतर हॅन्ड वॉश करायला सांगा. याच्या मदतीने तुम्ही मुलांमध्ये संसर्ग होण्याचा धोका टाळू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT