Food google
लाइफस्टाइल

Food : खिरीचे ‘हे’ हटके प्रकार नक्की ट्राय करा !

वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या पद्धतीच्या खीर बनवल्या जातात. तर फार पूर्वीपासूनचा आहे. खीरीचे वेगवेगळे प्रकार सध्या आपण खातो.

Pooja Karande-Kadam

पुणे : सणासुदीच्या दिवशी प्रत्येक घरात गोडाधोडाचा बेत असतो. गणपती बाप्पाला गव्हाची खीर आवडते. पाडव्याच्या दिवशी, मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी, दक्षिणेकडील सणांच्या वेळी पायसम बनवले जाते.

वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या पद्धतीच्या खीर बनवल्या जातात. तर फार पूर्वीपासूनचा आहे. खीरीचे वेगवेगळे प्रकार सध्या आपण खातो. त्यामूळे हे काही हटके खीरीचे प्रकार नक्की ट्राय करा...

बदाम खीर

साहित्य :

साल काढलेली बदामाची पूड

खवा

फुल क्रिम दुध

साखर आणि वेलची पूड

कृती :

बदामाची साल काढून पूड करा.

बदाम भिजवल्यास साल पटकन निघतात.

काढून त्याची पेस्ट करुन घ्या.

पातेल्यात दूध गरम करुन त्यात खवा आणि साखर घाला.

एक उकळी काढून त्यामध्ये बदामाची पूड घाला.

ती चांगली जाड होईल.त्यावर शेवटी वेलची पूड घाला.

थंड करुन खाल्ल्यास या खीरीची चव अधिक वाढेल.

दुधीची खीर

साहित्य:

एक वाटी किसलेला दुधी

दूध

ड्रायफ्रुट्सचे काप

वेलची पूड

तूप आणि खवा

कृती:

दूधी किसून घेऊन त्याचे पाणी काढून टाका.

पॅनमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये किसलेला दुधी घाला

त्यानंतर खवा घालून परता.

त्यामध्ये उकळलेले दूध, साखर घाला.

सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून ही दुधीची खीर मस्त सर्व्ह करा.

साऊथ इंडियन पायसम

पायसम हा साऊथ इंडियन खीरीचा प्रकार आहे. पायसम खीर ही मध्यम प्रकारात येते. फार जड किंवा फार पातळ नसते.

साहित्य:

फुल फॅट दुध

साखर किंवा गुळ

ड्रायफ्रुट्स

भाजलेल्या शेवया

केशराच्या काड्या

वेलची पूड

कृती:

दूध गरम करून घ्या.

त्यामध्ये भाजलेल्या शेवया घाला.

शेवया चांगल्या शिजल्या कि त्यामध्य ड्रायफ्रुट्स घाला.

वेलची पूड आणि केशराच्या काड्या घालून खीर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT