stomach pain esakal
लाइफस्टाइल

पोटदुखीचा त्रास होत असेल तर 'या' पदार्थांना ठेवा दूर!

पोट दुखत असेल तर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

शर्वरी जोशी

पोटदुखीची समस्या कधीही आणि कोणत्याही वेळी होऊ शकते. चुकीची आहारपद्धती किंवा जीवनशैली यामुळे अनेकदा पोटदुखीची समस्या निर्माण होते. अनेकजण पोट दुखू लागलं की घरगुती उपाय किंवा औषध, गोळ्या घेण्यास सुरुवात करतात. मात्र, अनेक उपचार केल्यानंतरही पोटदुखी काही केल्या थांबत नाही. परंतु, आपली आहारपद्धतीच चूकत असल्यामुळे ही समस्या काही केल्या पाठ सोडत नाही. म्हणूनच, पोट दुखत असताना कोणत्या पदार्थांचं सेवन व्यर्ज करावं ते जाणून घेऊयात. (foods-to-avoid-when-your-tummy-hurts-ssj93)

१. मसालेदार पदार्थ -

पोट दुखत असताना कधीही मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. मसालेदार पदार्थांमुळे पोटात जळजळ होते. त्यामुळे पोट दुखत असताना कधीही मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यामुळे त्रास वाढण्याची शक्यता असते.

२. प्रोसेस फूड -

प्रोसेस फूड म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ पोट दुखत असताना चुकूनही खाऊ नये. हे पदार्थ तयार करताना त्यात काही रासायनिक घटकांचा समावेश केलेला असतो. ज्यामुळे हे अन्न पचायला जड जातं. जर अन्न पचन नीट झालं नाही. तर पोटदुखीचा त्रास वाढू शकतो.

३. अॅसिडयुक्त खाद्यपदार्थ -

ज्या पदार्थांमध्ये आम्लता जास्त असतं ते पदार्थ पोट दुखत असताना खाऊ नये. त्यामुळे पोटदुखी वाढू शकते. पोट दुखत असताना खासकरुन अननस, टोमॅटो, संत्री खाऊ नयेत.

४. कॅफीनयुक्त पदार्थ -

पोट दुखत असताना कॉफी किंवा कॅफीनयुक्त पदार्थ चुकूनही खाऊ नका. त्यामुळे अॅसिडीटी वाढण्याची शक्यता असते.

५. हायफायबर फूड -

ज्या पदार्थांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं ते पदार्थ पोट दुखीच्या काळात कटाक्षाने टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT