Mosquitoes Protection esakal
लाइफस्टाइल

Mosquitoes Protection : डासांपासून तुमचं संरक्षण करेल अवघ्या दहा रुपयांचा हा उपाय

हिवाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी हा सोपा आणि स्वस्त उपाय जाणून घ्या

साक्षी राऊत

कमी स्वच्छतेच्या ठिकाणी डास मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तसेच थंडीच्या दिवसांतही डासांचे प्रमाण वाढते. अनेकदा डास चावल्याने तुमच्या मलेरिया डेंग्यू सारखे आजाराचा धोका वाढतो. तेव्हा हिवाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी हा सोपा आणि स्वस्त उपाय जाणून घ्या.

बाजारात डासांपासून बचाव करणारे कॉइल (Mortein ), अगरबत्ती, साउंड मशीन, इलेक्ट्रिक बग कॅचर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत, मॉस्किटो रिपेलंट मशिनसोबत (Mosquito Repellent) येणाऱ्या द्रवामध्ये इतकी रसायने असतात की त्याचा परिणाम थेट तुमच्या श्वसनावर किंवा आरोग्यावर होऊ शकतो. तर काहींना यामुळे त्वचेची अॅलर्जीही होऊ शकते.

हे साहित्य आणून घरच्या घरी दहा रुपयांत करा डासांपासून बचाव

साहित्य

१) अर्धा लिटर टर्पेन्टाइन तेल

२) 20-50 ग्राम कापूर

तुम्हाला कापूर बारीक करून त्याचं पावडर टर्पेन्टाइन ऑइलमध्ये मिक्स करायचं आहे. आणि मॉस्किटो रिपेलंट रिफिलमध्ये भरा. सामान्य बाजारातून आणलेल्या रिफिलप्रमाणेच ते मशीनमध्ये वापरले जाऊ शकते. घरामध्ये असलेल्या सर्व मशीनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. यासोबतच खोलीला टर्पेन्टाइन आणि कापूरचा वास येईल. ते स्प्रे बाटलीत भरूनही वापरता येते.

आणखी एक सोपा उपाय

साहित्य

कडूलिंबाचे तेल

खोबरेल तेल (अर्धी वाटी)

उकळलेले पाणी

वोडका (4-5 चमचे)

हे सर्व घटक एकत्रित केल्यास तुम्ही त्याचा स्प्रे तयार करू शकता. या दोन्ही गोष्टी तुम्ही ऑइल डिफ्युझरमध्ये वापरू शकता आणि स्प्रे बाटलीत ठेवून घरामध्ये शिंपडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT