Friendship Day News Sakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2023: मित्रांसह गोव्यातील या 5 ठिकाणांना नक्की द्या भेट,यंदा संधी गमावू नका

Friendship Day 2023 : मित्रांनो यंदा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्यासाठी गोव्याला नक्की भेट द्या.

सकाळ डिजिटल टीम

Friendship Day 2023 Goa Trip : दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘फ्रेंडशिप डे’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी तुम्ही अनेक प्लान्स आखायला सुरुवात केली असेल, हो ना ! ‘फ्रेंडशिप डे’ हा एक खास उत्सव आहे, या दिवशी दोन व्यक्तींमधील मैत्रीचे नाते साजरे केले जाते. 

या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटतात, गप्पागोष्टी करतात, काही खास गोष्टी एकमेकांसह शेअर करतात आणि हा दिवस अनोख्या पद्धतीने साजराही करतात. मैत्री हे असे नाते असते, जेथे आपल्याला आयुष्यात कोण व्यक्ती मित्र-मैत्रिणी म्हणून हवे आहेत; त्याचा निर्णय आपण स्वतःहून घेतो. हे नाते कोणीही कोणावरही लादत नाही. 

काही कारणास्तव ओळख झालेली अनोळखी व्यक्ती कधी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक होते, हे आपल्यालाही कळत नाही. म्हणूनच मैत्रीचे नाते अतिशय खास असते. मैत्रीचे हेच नाते सेलिब्रेट करण्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त एखाद्या सहलीचे आयोजन करू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर यंदा मित्र-मैत्रिणींसोबत गोवा ट्रिप नक्की प्लान करा. गोव्याची ट्रिप प्लान केल्यास येथील पाच ठिकाणांना नक्की भेट द्या.  

अगुआडा किल्ला (Aguada Fort)

अगुआडा किल्ला वर्ष 1612मध्ये बांधण्यात आला होता. हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता. इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण एक अतिशय रोमांचकारी अनुभव देईल.  

जीजस चर्च (Jesus Church)

जुन्या गोव्यामध्ये बॅसिलिका बोन जीजस चर्च आहे, जे सेंट फ्रान्सिस झेवियर यांना समर्पित करण्यात आले आहे. या चर्चमध्ये सेंटचे अवशेष ठेवण्यात आले आहेत. पोर्तुगालच्या राजाच्या सांगण्यावरून ते भारतात आले होते. चर्चच्या अगदी समोर सेंट कॅथेड्रल चर्च आहे, जे आशियातील सर्वात मोठे चर्च असल्याचे म्हटले जाते.  

पालोलम बीच (Palolem Beach)

गोव्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे पालोलम बीच. या बीचच्या चौफेर रेस्टॉरंट आहेत, जेथे स्वादिष्ट पदार्थांची चव चाखण्यास मिळते. पर्यटक येथे समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दृश्य पाहून स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वादही घेऊ शकतात. 

अर्वलेम लेणी (Arvalem Caves)

अर्वलेम लेणी गोव्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. ही गुहा सहाव्या शतकात बांधली गेली आहे. इतिहासाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे. 

चेपल चर्च (Chapel Church)

गोव्यातील माउंट मेरी चॅपल चर्च एका टेकडीवर बांधण्यात आले आहे. या चर्चमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. मित्रांसोबत या चर्चला नक्की भेट द्या. तसेच आपल्याला फोटोग्राफीची आवड असेल तर हे ठिकाण बेस्ट पर्याय ठरेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT