Friendship Ghosting Reasons eSakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2023 : एकेकाळच्या 'बेस्ट फ्रेंड'ने अचानक बोलणं केलं बंद? ही असू शकतात 'घोस्टिंग'ची कारणं

Ghosting Reasons : एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून अशीच अचानक गायब होते, म्हणजेच ती तुम्हाला घोस्ट करते.

Sudesh

फ्रेंडशिप डे हा खरंतर आपल्या मित्रांसोबत साजरा करायचा आनंदाचा दिवस. आयुष्यात बाकी काही कमावता आलं नाही, तरी चांगले मित्र कमावता यायला हवेत असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. मात्र, कित्येक वेळा आपले एकेकाळचे बेस्ट फ्रेंड म्हणवणारे मित्र अचानक तुमच्याशी संपर्क तोडतात. अशा वेळी स्वतःला दोष देण्याऐवजी, त्यांची कारणं समजून घेणं गरजेचं आहे.

काय आहे घोस्टिंग?

एखाद्या व्यक्तीशी अचानक सगळा संपर्क तोडून टाकणे, आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातून कसलंही स्पष्टीकरण न देता कायमचं निघून जाणे याला 'घोस्टिंग' असं म्हटलं जातं. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून अशीच गायब होते, म्हणजेच ती तुम्हाला घोस्ट करते.

स्वतःला दोष देणं टाळा

बऱ्याच वेळा घोस्टिंग झाल्यानंतर कित्येक लोक स्वतःला यासाठी दोषी ठरवतात. समोरची व्यक्ती आपल्याला सोडून गेली, म्हणजे आपल्यातच काही कमी किंवा दोष असेल असं कित्येकांना वाटतं. मात्र, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, असं असण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे स्वतःला दोष देणं टाळायला हवं.

काय असतात कारणं?

घोस्टिंग करण्यामागे सर्वात मोठं कारण हे असू शकतं, की त्या व्यक्तीला तुम्हाला दुखावायचं नाही. जवळच्या व्यक्तीशी एखाद्या कारणामुळे संपर्क तोडायचा तर आहे, मात्र त्यापूर्वी होणाऱ्या वादातही पडायचं नाही या विचाराने कित्येक लोक घोस्टिंगचा पर्याय निवडतात.

स्वार्थीपणा

एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने दिलेल्या निगेटिव्ह फीडबॅकमुळेही लोक घोस्टिंग करू शकतात. यावेळी त्यांना तुमच्याशी भांडण करण्याऐवजी थेट निघून जाणं हा अधिक योग्य पर्याय वाटू शकतो. अशा वेळी नक्कीच ते स्वतःच्या भावनिक सुरक्षिततेला प्राधान्य देत असतात. याला तुम्ही स्वार्थीपणाही म्हणू शकता.

स्वतःचा गिल्ट

कित्येक वेळा लोक स्वतःच्या गिल्टमुळेही तुम्हाला घोस्ट करु शकतात. आपण या मैत्रीच्या किंवा व्यक्तीच्या लायक नाही, किंवा आपल्याला ही व्यक्ती सोडून तर जाणार नाही या भीतीने ते स्वतःच त्या व्यक्तीशी संपर्क तोडतात. अशा वेळी मागचे वाईट अनुभव, न्यूनगंड अशी बरीच कारणं या घोस्टिंगमागे असू शकतात.

खोटी मैत्री

एखाद्या वेळी असंही शक्य आहे, की हे संपूर्ण नातंच खोटं असावं. कित्येक वेळा लोक एखाद्या उद्देशाने आपल्याशी मैत्री करतात; आणि ते उद्देश्य पूर्ण झालं की आपल्याला डच्चू देतात. अशा वेळी आपली चूक फक्त हीच असते की आपण त्या व्यक्तीमध्ये भावनिकरित्या अधिक गुंतून गेलो.

मूव्ह ऑन व्हा

आपल्यासोबत घोस्टिंग झाल्यानंतर त्याबाबत वाईट वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, त्यातून लवकरच पुढे जाणंही गरजेचं आहे. जी व्यक्ती आपल्या भावना समजून घेऊ शकली नाही, ती आपल्या मैत्रीच्या लायकच नव्हती असा विचार कदाचित तुम्हाला मूव्ह ऑन होण्यासाठी मदत करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT