Friendship Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2023 : जिवलग मित्रांना शब्दांत सांगा मैत्रीचं महत्व, पाठवा या हटके शुभेच्छा

तुमच्या सगळ्या जीवलग मित्रांशी असलेली तुमची घट्ट मैत्री आणि प्रेम या काही खास शुभेच्छा पाठवत व्यक्त करा.

साक्षी राऊत

Friendship Day Special Quote : फ्रेंडशिप डे म्हणजे मित्रमंडळीचा खास दिवस. कोणी फ्रेंडशिप बँड बांधून तर कोणी जीवलग मित्रमंडळींना शुभेच्छांसह गिफ्ट देत हा दिवस साजरा करतात. पण तुम्हाला माहितीये का? मैत्रीचं नातं हे फार भावनिक असतं. तेव्हा तुमच्या भावना जर तुम्ही शब्दात मांडू शकलात तर या दिवसांचा आनंद आणखी वाढेल. तेव्हा तुमच्या सगळ्या जीवलग मित्रांशी असलेली तुमची घट्ट मैत्री आणि प्रेम या काही खास शुभेच्छा पाठवत व्यक्त करा.

१) मैत्री तुझी माझ्यासाठी शब्दांपलीकडची

मैत्री तुझी माझ्यासाठी सर्व दुनियेपलीकडची

मैत्री तुझी माझी जिगरी यारी

मैत्री तुझी माझी कायम फुलासारखी फुलणारी

सवंगड्या माझ्यासाठी तुझी मैत्रीच सर्वकाही

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

२) मैत्री असे नातं जिव्हाळ्याचं

मैत्री असे प्रेम जसं शिवबासह मावळ्यांचं

मैत्रीत असतं सोबतीचं जगणं आणि सोबतीची दु:ख सोसणं

चुकल्यास सुधारणं आणि योग्य मार्ग दाखवणं हा मैत्रीचा खरा धर्म

मैत्री तू अशीच निभावलीस, मिळालास तू सोबतीला असेल यात माझे चांगले कर्म

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

३) वारा बेधुंद

दुनियादारीचा गंध

फुलांचा सुगंध

जन्मोजन्मीचे ऋणानुबंध

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

४) मैत्रीचे बंध

कधीच नसतात तुटणारे

असतात जुन्या आठवणींना उजाळा देऊन

गालातल्या गालात हसणारे

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

५) गुलाब उमलतो नाजुक काट्यावर

गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर

पक्षी उडतो पंखांच्या जोरावर

माणूस जगतो आशेच्या किरणांवर

आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Friendship Day)

६) जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते

दु:ख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैत्री असते...

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT