Friendship Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2024 : ही दोस्ती तुटायची नाय.! यंदाचा फ्रेंडशिप डे 'असा' करा साजरा, नेहमी राहील लक्षात

Friendship Day 2024 Celebration Tips: यंदा हा फ्रेंडशिप डे रविवारी (४ ऑगस्टला) साजरा केला जाणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Friendship Day 2024 : आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी असतात. हे मित्र-मैत्रिणी आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाले आहेत, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आनंदाच्या आणि दु:खाच्या गोष्टी शेअर करतो. हक्काने भांडतो आणि बोलतो. आपला मित्र कधी चुकत असेल तर आपण त्याला योग्य मार्ग दाखवतो. तसेच, अनेकदा मार्गदर्शन ही करतो.

मैत्रीचे हे नाते रक्ताचे जरी नसले तरी ते रक्ताच्या नात्यापेक्षा काही कमी नसते. उलट अधिक मजबूत असते. असा हा मैत्रीचा उत्सव आणि मैत्रीप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. यंदा हा फ्रेंडशिप डे रविवारी (४ ऑगस्ट) साजरा केला जाणार आहे. हा फ्रेंडशिप डे तुम्ही कशाप्रकारे साजरा करू शकता? काय प्लॅन्स करू शकता? त्याच्या काही आयडियाज आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत.

गेटटुगेदर प्लॅन करा

फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने तुम्ही गेटटुगेदरचा मस्त प्लॅन बनवू शकता. यानिमित्ताने तुमचे सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येतील. गेटटुगेदर निमित्त तुम्ही विविध गेम्स आयोजित करू शकता. कार्यक्रमाची छान थीम ठेवू शकता. या गेटटुगेदरच्या निमित्ताने तुमच्यातील मैत्रीचे नाते आणखी मजबूत होण्यास मदत होईल.

मूव्हीचा प्लॅन

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही एखादा सुंदर चित्रपट पाहायला जाऊ शकता. तुम्ही एखादा मैत्रीवर आधारित असलेला सिनेमा नक्कीच पाहू शकता आणि हा दिवस उत्तम प्रकारे साजरा करू शकता. शिवाय, मूव्ही पाहिल्यानंतर तुम्ही जवळपासच्या ठिकाणी एकत्रीतपणे जेवणाचा आस्वाद घ्यायला जाऊ शकता.

गिफ्ट्स

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही एकमेकांना सुंदर गिफ्ट्स देऊ शकता. तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला एखादी आवडती गोष्ट तुम्ही गिफ्ट करू शकता. तसेच, कॉफी मग, ग्रिटिंग कार्ड्स आणि फ्रेंडशिप बॅंड देखील देऊ शकता. हे गिफ्ट्स देऊन तुम्ही हा फ्रेंडशिप डे उत्तम प्रकारे साजरा करू शकता.

ट्रीपचा प्लॅन

जर तुम्हाला सगळ्यांनाच फिरण्याची आवड असेल तर तुम्ही यंदाच्या मैत्री दिनाच्या निमित्ताने एखादी सुंदर ट्रीप प्लॅन करू शकता. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत. जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. जर तुम्हाला जवळपासच कुठे फिरायला जायचे असेल तर तुम्ही एखादे रिसॉर्ट बूक करू शकता आणि ट्रीपचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT