Friendship Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2024 : विकतचं कशाला? तुमच्या हक्काच्या मित्रांना द्या तुम्ही स्वत: बनवलेले 'हे' खास गिफ्ट्स.!

Friendship Day Gift Ideas : तुमच्या मित्र-मैत्रिणींना खास सरप्राईज द्यायचे असेल तर तुम्ही हॅंडमेड गिफ्ट्स बनवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Friendship Day 2024 : मैत्री ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाची भूमिका बजावते. आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींचा मोठा वाटा असतो. मैत्रीप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि मैत्रीचा आनंद साजरा करण्यासाठी जगभरात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये ३० जुलैला हा 'आंतरराष्ट्रीय मैत्री दिन' साजरा केला जातो तर काही देशांमध्ये हा फ्रेंडशिप डे ऑगस्टमध्ये साजरा केला जातो.

आपल्या भारतात देखील ऑगस्टमधील पहिल्या रविवारी हा फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदा हा ‘फ्रेंडशिप डे’ ४ ऑगस्टला (रविवारी) साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी आपण मित्र-मैत्रिणींसोबत विविध प्लॅन्स करतो किंवा एकमेकांना गिफ्ट्स देतो.

यंदाचा हा ‘फ्रेंडशिप डे’ तुम्हाला खास बनवायचा असेल आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना खास सरप्राईज द्यायचे असेल तर तुम्ही देखील काही हॅंडमेड गिफ्ट्स बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हॅंडमेड गिफ्ट्सच्या स्पेशल आयडियाज सांगणार आहोत.

हातांनी बनवा ग्रिटिंग कार्ड

‘फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खास हाताने बनवलेले ग्रिटिंग कार्ड गिफ्ट करू शकता. यामुळे, त्यांना स्पेशल फील होईल आणि तुमचे मैत्रीचे नाते आणखी घट्ट होऊ शकेल.

Friendship Day 2024

हे ग्रिटिंग कार्ड बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कागदांचा वापर करू शकता. त्यामध्ये तुमच्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी एखादा खास संदेश लिहू शकता. एखादी सुंदर कविता किंवा दोस्ती स्पेशल शायरी देखील लिहू शकता.

कस्टमाईज्ड कॉफी मग

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुंदर असा कस्टमाईज्ड कॉफी मग गिफ्ट करू शकता. यासाठी तुम्हाला मार्केटमधुन एखादा कॉफी मग विकत घ्यायचा आहे.

Friendship Day 2024

मग, त्यावर तुमच्या आवडीच्या रंगांचा वापर करून पेटिंग करायचे आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या कॉफी मगवर सुंदर असे नाव रेखाटू शकता.

चॉकलेट बुके

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना या प्रकारचा चॉकलेट बुके गिफ्ट करू शकता.

Friendship Day 2024

यासाठी तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आवडीचे चॉकलेट्स खरेदी करा. त्यानंतर, घरच्या घरी कलरफूल पेपर आणि रिबिन्सच्या मदतीने तुम्ही असा चॉकलेट बुके बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाला मोठं वळण! आरोपीबाबत बाल न्याय मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Raigad News: मुसळधार पावसाची ठिकाणं प्रशासनाकडून दुर्लक्षित, विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर सुट्टीचे आदेश जारी; पालक संतप्त

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

SCROLL FOR NEXT