Happy Friendship Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Happy Friendship Day 2024 : ना सजवायची असते, ना गाजवायची असते, मैत्री तर फक्त रूजवायची असते.! मैत्री दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Happy Friendship Day 2024 : मनाच्या कप्प्यात तयार झालेला जिव्हाळ्याचा आधार, संकटात पाठीशी उभा राहणारा साधाभोळा चेहरा, म्हणजे मैत्री होय.

Monika Lonkar –Kumbhar

Happy Friendship Day 2024 : 'मनाच्या कप्प्यात तयार झालेला जिव्हाळ्याचा आधार, संकटात पाठीशी उभा राहणारा साधाभोळा चेहरा म्हणजे मैत्री होय' असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, हेच मित्र-मैत्रिणी आपल्या आयुष्यात मोलाची भूमिका बजावतात. या मैत्रीप्रती आनंद आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 'फ्रेंडशिप डे' ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा या मैत्री दिनाचा ४ ऑगस्ट (रविवार) उत्साह सर्वत्र पहायला मिळतोय.

आजचा हा 'फ्रेंडशिप डे' मैत्रीला समर्पित असून, या दिनानिमित्त तरूणाईमध्ये विविध प्लॅन्स बनवले जातात. काही जण एकमेकांना भेटतात तर काही जण फ्रेंडशिप बॅंड बांधून हा दिवस साजरा करतात. काही जण आपल्या मित्र-मैत्रिणींना आवडणाऱ्या गोष्टी गिफ्टच्या रूपात देऊन हा दिवस सेलिब्रेट करतात.

परंतु, यापैकी काहीही तुम्हाला शक्य न झाल्यास नाराज होऊ नका. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा पाठवून, हा मैत्री दिन स्पेशल बनवू शकता. त्यासाठी आम्ही आजच्या लेखात मैत्री दिनाच्या शुभेच्छा, मैत्री संदेश सांगणार आहोत. या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्कीच पाठवू शकता.

'मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही,

मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,

मैत्री ही कच्च्या धाग्यांसारखी आहे,

परंतु, या धाग्यांपेक्षा मजबूत

कोणतीही साखळी या जगात नाही,

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Friendship Day 2024

'मैत्री म्हणजे एक झाड

आपल्यासोबत वळणावर वाढणार

आणि आपली सावली होण्यासाठी

उन्हासोबत लढणार झाड म्हणजे मैत्री होय

तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा'..!

'मैत्री ही हसवणारी असावी

मैत्री ही चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी अशावी

एकवेळेस ती भांडणारी असावी

परंतु, कधीच बदलणारी नसावी

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा'..!

Happy Friendship Day 2024

जीवनात दोनच मित्र कमवा

एक श्रीकृष्णासारखा.. जो तुमच्यासाठी

युद्ध न करताही, तुम्हाला विजयी करेल,

आणि दुसरा कर्णासारखा..

जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

दुनियादारीमध्ये आम्ही थोडे कच्चे आहोत,

पण दोस्तीमध्ये एकदम सच्चे आहोत.

आमचे सत्य फक्त यावरच कायम आहे की

आमचे मित्र आमच्यापेक्षाही खूप चांगले आहेत..!

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Happy Friendship Day 2024

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याजवळ

बोलू शकतो, रागावू शकतो,

आणि आपल मन हलक करू शकतो..

ती म्हणजे जीवलग मैत्री होय..!

शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं.

मैत्रीचे खरे समाधान हे तर खांद्यावरच्या हातात असतं.

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध

फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध..

मैत्री दिनाच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा..!

Happy Friendship Day 2024

'मैत्री म्हणजे थोडं घेणं,

मैत्री म्हणजे खूप देणं

मैत्री म्हणजे देता देता

समोरच्याच होऊन जाणं..

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EC on Rahul Gandhi: शपथपत्रावर सही करा किंवा निरर्थक आरोपांसाठी देशाची माफी मागा... निवडणूक आयोग आक्रमक! राहूल गांधीचेही खोचक उत्तर

गायत्रीचं रहस्य, राहुलचा पर्दाफाश आणि सायलीचा भूतकाळ उलगडणार; मालिकांच्या महासंगमच्या प्रोमोने प्रेक्षक SHOCK !

Kolhapur Crime : बहिणीने आईवरून अपशब्द वापरला म्हणून भावाचा गळा चिरला, जयसिंगपूर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती उघड

Solapur News: Gopichand Padalkar यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, Sharad Pawar यांच्या समर्थकावर आरोप | Sakal News

Mangalagaur Celebration: पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा! नागपुरात रंगताहेत मंगळागौरीचे खेळ

SCROLL FOR NEXT