Gandhi Jayanti 2023  esakal
लाइफस्टाइल

Gandhi Jayanti 2023 : गांधी जयंतीसाठी कमी वेळात तयार होईल या विषयांवरील भाषण, एकदा नजर तर फिरवा

तुमच्या पाल्यालाही शाळेत भाषण करून कौतुक करवून घ्यायचे असेल तर त्याला हे नक्की सांगा

Pooja Karande-Kadam

Gandhi Jayanti 2023 : राष्ट्रपिता महात्त्मा गांधी यांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी झाला. देशात हा दिवस स्वच्छता दिन म्हणूनही साजरा केला जातो.

गांधीजींचे आपल्या स्वातंत्र्यात लाखमोलाचे योगदान आहे. त्यांच्या स्मरणार्थ देशात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेषत: शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. केवळ शाळा नाहीतर राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धाही आयोजित केल्या जातात.

ज्यामध्ये विद्यार्थी बापूजींच्या नितीमूल्यांबद्दल आणि त्यांच्या तत्त्वांबद्दल जागृती करतात. यानिमित्ताने निबंध, चित्रकला, भाषण, प्रश्नमंजुषा यासह स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तुम्हाला किंवा तुमच्या पाल्यालाही शाळेत भाषण करून कौतुक करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी ही बातमी वाचा.

गांधी जयंतीला दोनच दिवस उरले आहेत. तुम्हालाही या दिवशी तुमच्या शाळेत भाषण देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही विषय सांगणार आहोत ज्यावर तुम्ही भाषण देऊ शकता. ज्याची तयारीही कमी वेळात घेऊ शकता.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींचा संघर्ष

राष्ट्रपिता यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षावरही विद्यार्थी चमकदार भाषण करू शकतात. या अंतर्गत ते सांगू शकतात की बापूंनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व काही कसे बलिदान दिले.  (Mahatma Gandhi)

विद्यार्थी राष्ट्रपिता यांच्या चळवळीची माहिती

महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या महत्त्वाच्या चळवळींची माहिती देखील देऊ शकता. यामध्ये असहकार आंदोलन, मीठ सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, दलित चळवळ यांचा समावेश आहे. पण ही आंदोलने, चळवळी अगदी शांततेत पार पडल्या होत्या.

महात्मा गांधी आणि अहिंसा

महात्मा गांधींचा अहिंसेवर ठाम विश्वास होता आणि त्यांनी त्याचे संपूर्ण पालन केले. सध्याच्या जगात हिंसक वृत्ती वाढल्या आहेत. अशात तुम्ही महात्मा गांधीजींचे विचार तुम्ही जगापर्यंत पोहोचवू शकता. अहिंसा आणि जीवन त्यांच्या या तत्त्वावर भाषण देऊन, तुम्ही सर्वांना चांगले राष्ट्र घडवण्यासाठी हिंसेपासून दूर राहण्याचे महत्त्व लक्षात आणून देऊ शकता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT