Ganesh Chaturthi Festival esakal
लाइफस्टाइल

Ganeshotsav 2023 : मातीच्या मूर्ती खरेदी करताना क्यूआर कोड नक्की तपासा, वाचा सविस्तर

गणेशभक्तांना शुद्ध मातीच्या मूर्ती सहज मिळाव्या यासाठी पारंपरिक मूर्तिकार आणि हस्त कारागार संघाने पुढाकार घेतला.

सकाळ ऑनलाईन टीम

Ganeshotsav 2023 : गणपतीची शुद्ध मातीची मूर्ती मिळण्यासाठी पारंपरिक मूर्तीकार आणि कारागीर संघाने पर्याय शोधला आहे. पारंपरिक क्यूआर कोड आले आहे. या दुकानातूनच श्री मूर्ती खरेदी कराव्यात असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

गणेशभक्तांना शुद्ध मातीच्या मूर्ती सहज मिळाव्या यासाठी पारंपरिक मूर्तिकार आणि हस्त कारागार संघाने पुढाकार घेतला. नोंदणी केलेल्या मूर्तिकाराच्या दुकानावर क्यूआर कोडचे फलक लावण्याचे अवाहन केले. त्यानुसार या सदस्यांनी क्यूआर कोड दर्शनी भागात लावले आहेत.

संघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाठक म्हणाले, उच्च न्यायालयाने बंदीच्या आदेशानंतर राज्य सरकारने कार्यवाही करिता मनपा-जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत दोन बैठकी झाल्यात, परंतु अद्याप मनपाने अधिकृत नोटिफिकेशन काढलेले नाही. संघातर्फे मूर्तीकारांना परवाना शुल्क माफ आणि मातीच्या मूर्ती करणाऱ्या विक्रेत्यांना अधिकृत जागा देण्याची मागणी केलेली आहे. अद्यापही हा निर्णय मार्गी लागलेला नाही.

क्यूआर कोडचे लोकार्पण

माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नुकतेच क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. संचालन कार्याध्यक्ष चंदनलाल प्रजापती यांनी तर आभार उपाध्यक्ष मनोज कवाडे यांनी मानले. कार्यक्रम जान कुरवाद, प्रवीण गारो, बंटी चक्रवर्ती कृष्णा प्रजापती, प्रदीप ठाकरे, विशाल चौधरी उपस्थित होते. (Ganesh Chaturthi Festival)

या आहेत संघाच्या अटी

श्रींच्या मूर्तीवर मूर्तीकाराच्या नावाचा रबर स्टॅम्प असणार आहे

शहरात चार मूर्तीकार पंजीकृत असून त्याच्याकडे क्यूआर कोड आहे

कोडची नक्कल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे

गणेशभक्तांनी मूर्तिकारांच्या विश्वासनियतेकरिता पावतीवर मातीची मूर्ती •असल्याचे लिहून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT