Ganga Dussehra 2024 Sakal
लाइफस्टाइल

Ganga Dussehra 2024: गंगा दशहराला काय करावे अन् काय नाही? वाचा एका क्लिकवर

Ganga Dussehra 2024: आज १०० वर्षानंतर एक अद्भूत योग घडून आलाय यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Ganga Dussehra 2024: गंगा दशहरा हा सण १६ जून म्हणजेच आज साजरा केला जात आहे. या दिवशी गंगास्नान करण्यासाठी लांबून लोक येतात. या दिवशी गंगा स्नान आणि दान करणे हे विशेष मानले जाते.

गंगा दशहऱ्याच्या सणाला धर्मग्रंथांमध्ये विशेष महत्त्व आहे. या दिवशी केवळ गंगा मातेच्या दर्शनाने साधकासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. धार्मिक मान्यतेनुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. या कारणास्तव या दिवशी गंगा दसरा हा सण साजरा केला जातो. या दिवशी दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.

गंगा दशहऱ्याला काय करावे?

गंगा दशहऱ्याला गंगेत स्नान करून दान करावे.

या दिवशी माता गंगासोबत भगवान विष्णूची पूजा करावी.

गंगा दशहऱ्याला तुम्ही पाणी, फळे किंवा अन्न दान करू शकता.

गंगा दशहऱ्याच्या दिवशी गंगाजल घरात ठेवा आणि भगवान शिवाला अभिषेक करा.

गंगा दशहऱ्याला काय टाळावे?

गंगा दशहऱ्याच्या दिवशी वेळी तामसिक अन्न खाऊ नये.

या दिवशी कोणाशीही वाद घालणे टाळा.

गंगा दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही भिकाऱ्याला रिकाम्या हाताने घरी पाठवू नका.

या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि तोंडातून चुकीचे शब्दही काढू नका.

गंगा दशहरा करण्याची पूजा विधी

गंगा दशहऱ्याच्या दिवशी सकाळी गंगा नदीत किंवा गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करावे.

त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे.

या दिवशी गंगा मातेची विधिवत पूजा करा.

यासोबतच गंगा स्तोत्राचे पठण करावे.

शेवटी आरती करून भोग अर्पण करावेत.

गंगा दशहऱ्याचे महत्व

स्कंद पुराणात गंगा दशहऱ्याला खूप महत्व आहे. माता गंगा ही पापांचा नाश करणारी आणि मोक्ष देणारी मानली जाते. माता गंगा मानवाला मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर अवतरली आहे. साधकाला गंगेच्या पाण्याच्या स्पर्शानेच स्वर्ग प्राप्त होतो. गंगा मातेच्या पवित्र जलामध्ये सर्व संकटांपासून मुक्ती देण्याची अद्भुत शक्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT