Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : 'या' गोष्टींच्या मदतीने सजवा तुमची बाल्कनी, घरापेक्षा जास्त प्रसन्न वाटेल

Gardening Tips : बाल्कनी हा एक घराचा सुंदर कोपरा असतो. जिथे आपण विविध प्रकारची झाडे आणि रोपांच्या कुंड्या ठेवतो.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : घरात बाल्कनी असल्यावर घराला छान शोभा येते. प्रत्येकाच्या घरात बाल्कनी असते. आताच्या मॉर्डन जगात शहरीकरणामुळे घरात भलीमोठी बाल्कनी जरी दिसत नसली तरी छोटीशी गॅलरी ही असतेच. हा एक घराचा सुंदर कोपरा असतो. जिथे आपण विविध प्रकारची झाडे लावतो. रोपांच्या कुंड्या ठेवतो.

ही गॅलरी हिरवीगार दिसावी आणि इथली जागा स्वच्छ असावी, याची आपण पुरेपूर काळजी घेतो. जेणेकरून सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत या बाल्कनीत किंवा गॅलरीत बसून मस्त चहाचा आनंद घेता यावा.

अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुमची बाल्कनी किंवा गॅलरी छानपैकी सजवायची असेल तर, आज आम्ही तुम्हाला त्या संदर्भात काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्य बाल्कनीला किंवा गॅलरीला नवा लूक देऊ शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

वॉल प्लांटर

तुम्ही तुमच्या बाल्कनीला किंवा गॅलरीला सुंदर लूक देण्यासाठी या वॉल प्लांटरची मदत घेऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन वेबसाईट्सवर तुम्हाला विविध प्रकारचे वॉल प्लांटर पहायला मिळतील. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटप्रमाणे खरेदी करू शकता.

हे वॉल प्लांटर तुम्ही गॅलरीत लावल्यानंतर यात तुम्हाला कुंड्या ठेवायला मदत होईल आणि बाल्कनीत जागा देखील पुरेशी राहिल. हे वॉल प्लांटर अधिक सुंदर दिसतात. वॉल हॅंगिंग, पेंटिंग आणि आकर्षक लाईटच्या मदतीने तुम्ही तुमची बाल्कनी किंवा गॅलरी सजवू शकता.

बर्डहाऊस ठेवा

तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा गॅलरीमध्ये बर्डहाऊस ठेवू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पक्ष्यांचे घर अर्थात बर्डहाऊस ठेवू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पक्षी यात पाळू शकता. जेणेकरून ते या घरात राहतील आणि बाहेर घाण ही होणार नाही. अधूनमधून या बर्ड हाऊसमधील पक्ष्यांना अन्न आणि पाणी ठेवा.

हॅंगिंग प्लॅंट्स

आजकाल हॅंगिंग प्लॅंट्सची भलतीच क्रेझ पहायला मिळते. गॅलरी किंवा बाल्कनी सजवण्यासाठी तुम्ही या हॅंगिंग प्लॅंट्सचा वापर करू शकता. बाजारात किंवा ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला या प्रकारचे हॅंगिंग प्लॅंट्स सहज मिळतील.

हे हॅंगिंग प्लॅंट्स दिसायला अतिशय सुंदर दिसतात. जर तुमची बाल्कनी किंवा गॅलरी लहान असेल तर तुम्ही या हॅंगिंग प्लॅंट्सचा वापर करू शकता. यामुळे, गॅलरीला सुंदर लूक ही मिळेल आणि जागा ही पुरेशी राहील. या प्रकारच्या हॅंगिंग प्लॅंट्समध्ये रंगीबरेंगी रोपे जरूर लावावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT