Spider Plant: Sakal
लाइफस्टाइल

Spider Plant: स्पायडर प्लॅंट लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

Spider Plant: तुम्हीही घरी स्पायडर प्लॅंट लावत असाल तर पुढील गोष्टींची काळजी घेऊ शकता.

पुजा बोनकिले

gardening tips how to grow spider plant follow these tips

घराची सजावट करण्यासाठी इनडोअर प्लॅंट्स ठेऊ शकता. यामुळे घर अधिक आकर्षक दिसते. तुम्ही मनी प्लांटसोबतच स्पायडर प्लॅंट देखील घरात ठेऊ शकता. यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. या प्लॅंटची खास गोष्ट म्हणजे याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. पण अनेकवेळा काही कारणांमुळे हे रोप पिवळं पडतं. अशावेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • पानं तपकिरी पडणे

स्पायडर प्लॅंटला जास्त पाणी किंवा खत दिल्याने पानं पिवळी पडतात. यामुळे योग्य प्रमाणात खत आणि पाणी घालावे. जेव्हा रोपाला पाण्याची गरज असेल तेव्हाच पाणी टाकावे. या रोपाला थेट सुर्यप्रकाशात ठेऊ नका.

  • पानं गळणे

स्पायडर प्लॅंटला कमी-जास्त पाणी दिल्याने त्याची पानं गळू लागतात. सर्वात पहिले जमिनीतील ओलावा तपासणे आणि त्यानुसार झाडाला पाणी द्यावे.

  • पानं पिवळी पडणे

स्पायडर प्लॅंटची पानं पिवळी अनेक कारणांमुळे पडतात. या रोपाला थेट सुर्यप्रकाश, जास्त किंवा कमी पाणी दिल्यास पिवळी पडू शकतात. स्पायडर प्लॅंटला चुकूनही थेट सुर्यप्रकाशात ठेऊ नका. तसेच खत आणि पाणी आवश्यकतेनुसार टाकावे.

  • पानांवर डाग दिसणे

पानंवर किड पडल्यास किंवा हवामानात बदल झाल्यास किटकनाशक म्हणून रोपावर कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करावी. यामुळे रोपाची योग्य वाढ होईल.

  • मुळा सडणे

अनेक वेळा झाडामध्ये जास्त पाणी साचल्यामुळे त्याची मुळे कुजायला लागतात. यामुळे कुंडीमध्ये छोटे छोटे छिद्र करावे. यामुळे तुमचा स्पायडर प्लॅंट दीर्घकाळ टिकू शकतो.

  • पुढील गोष्टीही ठेवा लक्षात

स्पायडर प्लॅंट थेट सुर्यप्रकाशात ठेऊ नका.

मातीची आर्द्रता तपासत रोपाला पाणी टाकावे.

दर 2-3 महिन्यांनी रोपाला खत द्या.

मृत पाने आणि देठ काढून टाकावे.

झाडाचे कीटक आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी घरगुती उपाय करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : अंधेरीत एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडल्याने खळबळ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

हरिहरेश्वर मंदिरात रक्तरंजित थरार! आईने पोटच्या मुलीवर केला धारदार शस्त्राने वार; स्वतःला संपवून घेण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT