Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : झाडांची काळजी कोण घेणार? म्हणून फिरायला जाणं टाळू नका..! फक्त 'या' गोष्टी करा, झाडे राहतील हिरवीगार

Gardening Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताना झाडांची काळजी कशी घेणार? आणि कोण घेणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : झाडे लावायला सगळ्यांनाच आवडतात. मग, तुम्ही गावी राहत असाल किंवा शहरात, त्याने काही फरक पडत नाही. शहरातील घराजवळ छोटीशी बाग किंवा सोसायटीतील गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये आवडीची झाडे लावली जातात. विविध प्रकारची आकर्षक झाडे खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. या झाडांची आपण मनापासून काळजी घेतो. बहरलेली फुले आणि डोलणारी झाडांमुळे तुमची बाग खुलून दिसते.

दैनंदिन जीवनात आपण दररोज झाडांना पाणी घालतो, खत घालतो आणि झाडांची मनापासून काळजी घेतो. परंतु, उन्हाळ्यात एक दिवस जरी झाडांना पाणी द्यायला विसरलो किंवा काही कारणांमुळे पाणी देता आले नाही तरी, झाडे कोमेजून जातात. उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या लागतात, त्यामुळे, मुलांसोबत फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत घराबाहेर पडताना मग झाडांची काळजी कशी घेणार? आणि कोण घेणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.

या परिस्थितीमध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची? ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या संदर्भातल्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीवर बाहेरगावी असताना ही, तुमची झाडे हिरवीगार ठेवू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

झाडे सावलीत ठेवा

उन्हाळ्याच्या सुट्टीवर जाण्यापूर्वी तुम्ही लावलेल्या झाडांच्या कुंड्या सावलीत ठेवा. असे केल्याने झाडांचा तीव्र उन्हाच्या झळांपासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या झाडांसाठी अशी जागा शोधा की, जिथे सकाळी किंवा संध्याकाळी हलका सूर्यप्रकाश असेल.

प्लॅस्टिक बॉटल

वनस्पतींमध्ये दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करू शकता. यासाठी तुमच्या आवडीनुसार, घरातील एखादी लहान किंवा मोठी  प्लॅस्टिकची बॉटल घ्या.

आता प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी भरा आणि झाकणाला छोटे छिद्र करा. त्यानंतर, ही बॉटल झाडाला लटकवा किंवा झाडाजवळ ठेवा. बॉटल अशी ठेवा की, त्यातील पाणी झाडाच्या मातीमध्ये झिरपायला हवे. याची अवश्य काळजी घ्या.

नारळाची साल

झाडांना हिरवेगार ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा असणारा घटक म्हणजे पाणी होय. तुम्ही सुट्टीवर असताना भर उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी तुम्ही नारळाच्या सालीचा वापर करू शकता. त्यासाठी, कात्रीच्या मदतीने नारळाची साल कापून घ्या. ती सूती कापडात शिवून पाण्यात भिजवून रोपाजवळ ठेवा. यामुळे, किमान ४-५ दिवस मातीमध्ये ओलावा राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT