Gauri Ganpati 2023 esakal
लाइफस्टाइल

Gauri Ganpati 2023 : गणपती बाप्पांसोबत गणोबा का असतो? त्याच्या पूजेचे पौराणिक महत्त्व काय आहे?

आपण गणोबा आणि गणपती असे दोन गणपती पूजतो का?

Pooja Karande-Kadam

Gauri Ganpati 2023 : सर्व देवांमध्ये लाडका कोणी असेल तर तो असतो गणेशा. गणेशाचे वाजत गाजत आगमन झाले आहे. गणेशाची सकाळ-संध्याकाळ आरती केली जातेय. मोठ्या उत्साहात प्रसादाचेही वाटप केलं जात आहे. अशा या उत्साहाच्या वातावरणात बाप्पा घरी आणि मंडळात विराजमान झाले आहेत.   

गणपती बाप्पासोबत एक छोटी गणेशाची प्रतिमाही घरात आणली जाते. त्याला गणोबा म्हणतात. मातीच्या गोळ्यापासून गणोबाची प्रतिकृती केली जाते. तो गणोबा आपल्या मूख्य मुर्तीच्या बाजूला पूजण्याची प्रथा आहे. हा गणोबा म्हणजे नक्की कोण आणि त्याचे पौराणिक महत्त्व काय आहे, याची इतिहासतज्ज्ञ ऍड.प्रसन्न मालेकर यांनी सांगितलेली माहिती पाहुयात.

कोण आहे गणोबा?

माता पार्वतीने अंगाच्या मळापासून गणोबा घडवला. तोच हा गणोबा. गणेशानंतर येणाऱ्या गौरीचे ते बाळ. त्याचे नाव गणू. पण माहेरी येणाऱ्या लेकींचा पोरगा त्याला नुसतं नावाने कसं बनवायचं म्हणून आदरार्थी लावलेला ज्योतिबा खंडोबा यांच्याप्रमाणे बा नावाचा प्रत्यय म्हणून तो गणोबा.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव म्हणजे पार्थिव गणपती व्रत या व्रताची मूळ देवता म्हणजे हा गणोबा. कारण पूर्णब्रम्ह ओमकार आपल्या उदरी पुत्ररूपाने यावा, यासाठी माता पार्वतीने श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अशी मातीची गणरायाची मूर्ती घडवून व्रत केले. आणि त्याचे फलस्वरूप म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गिरीजात्मज अवतार झाला.

याची स्मृती म्हणून दरवर्षी आपण हे पार्थिव गणपती व्रत करतो. पार्थिव म्हणजे पृथ्वी पासून बनलेला होय. गणोबा हा नेहमी काळ्या मातीचा घडवतात. गणोबा गणेशाच्या जन्माच्या कथेचे रहस्य देखील उलगडतो.

आपणा सर्वांना माहिती आहे पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून (हा मळ म्हणजे अंगावरच्या त्वचेचा घाणीचा थर नव्हे तर स्नानापूर्वी लावलेल्या केशर चंदनाच्या उटीचा थर) त्या थरापासून पार्वतीने स्वतःचा गण तयार केला. गणोबासाठी वापरली जाणारी माती ही नदीच्या गाळाची असते. (Ganesh Chaturthi 2023)

गणपती बाप्पांसोबत हा गणोबा पूजतात

श्रावण भाद्रपद म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ संचित झाल्याचे दिवस. हा गाळ शेतीसाठी किती उपयुक्त असतो हे सुज्ञास सांगणे न लगे या गाळाच्या मातीतच गणेशाची जन्म कथा उलगडते. पृथ्वी म्हणजे साक्षात जगन्माता पार्वती.

या पार्वतीच्या अंगावरचा मळ पावसाच्या धारांनी धुवून निघतो आणि मैदानी प्रदेशात स्थिरावतो हा गाळ जणू संपन्नता घेऊन येतो. म्हणूनच की काय कुंभार बांधव याच गाळापासून या पार्थिव गणपतीची निर्मिती करतात.

व्रत विधीप्रमाणे यजमानाने स्वतःच्या हाताने असा मातीचा गणपती घडवणे अभिप्रेत आहे. पण मूर्ती शास्त्रानुसार गणरायाची मूर्ती घडवणे हे सगळ्यात अवघड काम आहे. कारण त्याची सोंड हात पाय लंबोदर यांचा समन्वय साधणे नवख्या माणसाला शक्य होत नाही बरेचदा सोंड गळून पडते.

गणपतीचा मारुती होतो म्हणूनच करायला गेलो गणपती झाला मारुती अशी म्हण प्र चलित झाली असावी म्हणून या कामात कुंभार बांधवांचे सहाय्य घेण्याची पद्धत निर्माण झाली आणि हा पार्थिव गणपती कुंभार वाड्यातून येऊन आपल्या घरामध्ये विसावू लागला. (Ganesha)

माणसाला मुळातच सौंदर्याचे आकर्षण. या आकर्षणापोटी आणि कुंभार बांधवांच्या अंगभूत कलेमुळे पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये फरक पडते गेला. काळ्या हाताच्या ओंजळीत मावणाऱ्या गणोबापेक्षा चित्रकारांनी चितारलेला मंदिरात मूर्तिकारांनी घडवलेला गणपती भक्ताच्या मनाला भुरळ पडू लागला. मग चतुर्भुज सिंहासनाधिष्ठित अशा गणरायाच्या मूर्तींची निर्मिती सुरू झाली.

मग आपण दोन गणपती पूजतो का?

आपण घरी देवाला लागतं म्हणून एखादी गोष्ट शास्त्रोक्त पद्धतीने करतो. आणि उत्साह म्हणून जल्लोषात तीच गोष्ट पुन्हा करतो. असेच या गणोबा आणि गणपतीचे आहे. परंपरागत चालत आलेला गौराईच्या मळाचा गणपती म्हणून गणोबा पुजला जातो. तर, त्याचसोबत हौस म्हणनू ११, २१,५१ फुटी गणेश मुर्ती साकारल्या जातात. देव जरी वेगळ्या आकारात असला तरी भाव तोच असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT