Ganesha Chaturthi 2024 esakal
लाइफस्टाइल

Ganesha Chaturthi 2024 : गौराईचा साज अन् लाखमोलाचा थाट; गौराईसाठी पटकन नेसवता येतील अशा प्रकारच्या साड्या

Gauri Saree Draping Style And Tips : गौराईसाठी केली जाणारी सजावटीत महत्त्वाचा भाग असतो साडी नेसवणे. गौराईला साडी नेसवण्यासाठी महिलांना अथक परिश्रम करावे लागतात.

सकाळ डिजिटल टीम

Gauri Ganpati Festival : 

गौराईंचे आज मोठ्या थाटात आगमन झालं आहे. गौरीच्या रोपांची जुडी बनवून त्यामध्ये फुलोरा घालून सजवले जाते. अन् त्याची पूजा करून त्यांना घरात घेतले जाते. गौराईला सजवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे देखावे साकारले जातात.

घरोघरी गौराई विराजमान झाली आहे. गौराई ही प्रत्येकाघरी वेगळी असते. काही ठिकाणी ती झाडा-फुलांची असते, तर काही ठिकाणी फक्त मुखवट्यांची असते. तर काही ठिकाणी ती संपूर्ण साडीत उभी केली जाते. (How to drape gauri saree)

गौराईसाठी केली जाणारी सजावटीत महत्त्वाचा भाग असतो साडी नेसवणे. गौराईला साडी नेसवण्यासाठी महिलांना अथक परिश्रम करावे लागतात. त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही टिप्स. ज्या तुम्हाला गौराईला साडी नेसवण्यासाठी फायदेशीर ठरतील.

गौराईला कोणत्या प्रकारची साडी नेसवावे हे पाहुयात.

 

गौराईला नेसवा काष्टा साडी

पारंपरिक गौराईंचा सणाला अनेक महिला, तरूणी काष्टा नेसतात. तर त्यात गौराईला का मागे ठेवायचे. गौराईलाही तुम्ही काष्टा साडी नेसवा.

सहावार साडी

गौराईला सहावार साडी नेसवणे हे सुद्धा जिकरीचे काम असते. कारण, गौराईची उंची, तिचा चेहरा, हात यांना कुठेही धक्का न लावता साडी नेसवावी लागते. त्यामुळे ती सांभाळून करावी लागते. तुम्ही गौराईला अशा पद्धतीने साधी साडी नेसवू शकता.

गौराईला राजलक्ष्मी साडी नेसवा

गौराईसाठी सध्या साडी सहावार किंवा नऊवारी नाही. तर, राजलक्ष्मी साडी नेसवण्याची पद्धत नवी आहे. ही साडी नऊवारी प्रकारात मोडते पण ती दिसायला वेगळी असते. त्यामुळे सध्या तरूणी अन् महिलाही कार्यक्रमांसाठी अशा साड्या शिवून घेतात किंवा नेसतात.

 ट्रेंडी स्टाईल साडी                       

सध्या सहावारी साडीतील हा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. सहावार साडीच्या निऱ्यांपासून ही वेगळी डिझाईन बनवली जाते. ज्यामुळे गौराईचे सौंदर्य अधिकच खुलून दिसेल.           

बैठ्या गौराईला साडी

गौराई घरी आल्यानंतर तिची अनेक रूपात पूजा केली जाते. काही ठिकाणी दळण दळत असलेली गौराई, काही ठिकाणी बसलेली गौराई साकारली जाते. तुम्हालाही बैठ्या गौराईला साडी नेसवायची असेल तर हे पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT