germany sakal
लाइफस्टाइल

Germany : जर्मनीत घराची किल्ली हरवल्यास पडतो ९० हजार रुपयांचा भुर्दंड

हरवलेली किल्ली कोणाला मिळाली तर ती व्यक्ती इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरू शकते. एवढेच नाही तर ती व्यक्ती तुमच्या घरासहीत इतर घरांमध्येही प्रवेश करू शकते.

नमिता धुरी

मुंबई : घराची किल्ली हरवली तर आपण सहसा काय करतो ? किल्ली बनवणाऱ्याला बोलवतो किंवा कुलूप तोडतो व नंतर नवीन बनवून घेतो. या सगळ्याचा खर्च काहीशेंपर्यंत फार-फार तर १-२ हजारांपर्यंत जातो.

पण तुम्हाला माहीत आहे का की, जर्मनीत घराची किल्ली हरवली तर ९० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे कधी जर्मनीत राहायला जाणार असाल तर किल्ली नक्की सांभाळून ठेवा आणि एवढा खर्च येण्यामागचं कारणही जाणून घ्या.

जर्मनीमध्ये तुमच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराची किल्ली आणि इमारतीतील सर्व घरांची किल्ली एकच असते. त्यामुळे हरवलेली किल्ली कोणाला मिळाली तर ती व्यक्ती इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरू शकते. एवढेच नाही तर ती व्यक्ती तुमच्या घरासहीत इतर घरांमध्येही प्रवेश करू शकते.

अशावेळी किल्ली हरवल्यास खबरदारी म्हणून इमारतीच्या कुलूपासहीत सर्वच घरांची कुलूपे बदलावी लागतात. हे काम मुळीच स्वस्त नसते. यासाठी कमीत कमी १ हजार युरो म्हणजेच ९० हजार रुपये खर्च येतो..... आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा खर्च किल्ली हरवणाऱ्याला उचलावा लागतो.

किल्ली हरवल्यानंतर दार उघडणाऱ्याला बोलवावे लागते. त्याचाही खर्च प्रचंड असतो. दिवसाच्या वेळांनुसार त्याचे शुल्क वेगवेगळे असते. दार उघडल्यानंतरही तो वेगळे पैसे घेतो. तसेच अनेक घरांच्या किल्ल्या पेटंटेड असतात. त्यामुळे त्याच आकाराची किल्ली बनवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतरही किल्ली बनवणे स्वस्त नसते.

यावर उपाय काय ?

यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे घराची किल्ली सांभाळून ठेवणे आणि मित्रमैत्रिणींकडे दुसरी किल्ली ठेवणे. पण तरीही किल्ली हरवलीच तर काय कराल ?

जर्मनीमध्ये असे खर्च पर्सनल लाएबिलिटी इन्शॉरन्समधून भागवले जातात. त्यामुळे जर्मनीत जाणाऱ्यांनी हा इन्शॉरन्स घेणे आवश्यक ठरते. तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तेथे तुमच्या हातून काही लहान-मोठे नुकसान झाल्यास, अगदी चहा सांडून फरशी खराब झाल्यास तोही खर्च या इन्शॉरन्समधून भागवता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT