Ghee For Face esakal
लाइफस्टाइल

Ghee For Face : काळवंडलेल्या चेहऱ्यासाठी क्रिम,पार्लर ट्रिटमेंट करून झालं असेल तर एकदा देशी तूप लावा, फरक पडतो!

तूप चेहऱ्याला कसे लावायचे?

Pooja Karande-Kadam

Ghee For Face :  तूप खाऊन वजन वाढतंय, तूपामुळे बद्धकोष्टता होते, अशा अनेक तक्रारी सुरू असतात. स्पेशली तारूण्यात आलेल्या तरूणीही तुपापासून चार हात लांबच असतात. पण आजची ही बातमी वाचून तरूणीही तूपासोबत गट्टी करतील.

रोटीवर तूप लावून तुम्ही अनेकदा खाल्ले असेल, पण आज आम्ही तुम्हाला तुपाने चेहरा कसा चमकवायचा हे सांगणार आहोत. लोक भाकरी, भाजी आणि डाळीमध्ये देशी तूप घालतात आणि ते मोठ्या उत्साहाने खातात.

लहानपणापासून घरातील लोक तूप खाण्याचा हट्ट करू लागतात. हेल्दी फॅट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले देसी तूप चेहरा सुधारण्यासाठी देखील प्रभावी ठरते. आयुर्वेदातही तुपाचे फायदे सांगितले आहेत. (Ghee For Face : Applying desi ghee on the face will remove stains, know the right way to use it to get glowing)

ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन ए ने भरपूर देसी तूप देखील चेहऱ्यावरील डाग कमी करते. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर तूप वापरण्याची योग्य पद्धत, ज्यामुळे तुमचा चेहरा चमकेल.(Face pack)

तुपामुळे त्वचेला मिळणारे फायदे

- टॅनिंग दूर होण्यास मिळते मदत

- त्वचा हायड्रेट राहते

- त्वचेला ग्लो येतो

तूप चेहऱ्याला कसे लावायचे?

डाग कमी करण्यासाठी हळद, बेसन तुपात मिसळून लावावे. यासाठी एका भांड्यात १ चमचा बेसन, १ चमचा तूप आणि १ चिमूट हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. (Glowing Skin Tips)  

तूप आणि केशर पॅक

तूप आणि केशर एकत्र करून लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि घट्टपणा येतो. यासाठी अर्धा चमचा देशी तुपात केशराचे ४ ते ५ धागे मिसळा. नंतर ते चेहऱ्यावर आणि मानेला चोळून लावा. या पॅकमुळे चेहऱ्यावर चमक येते.

तूप आणि मसूर डाळ पॅक

मसूर आणि तूप एकत्र लावल्याने त्वचा चमकदार होते आणि डागही कमी होतात. यासाठी 3 चमचे मसूर 2 तास भिजत ठेवा आणि नंतर बारीक करा. डाळीच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा तूप मिसळून पॅक तयार करा. हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर रगडताना स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. मसूद दाल आणि तुपाचा हा पॅक तुम्ही मानेवर आणि हातावरही लावू शकता. (Home Remedies)

या समस्या होतील दूर

चेहऱ्यावर ग्लो येतो

तूप हे तेलकट तसेच कोरडी त्वचा या दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरतं.पावसाळ्यात त्वचा वरच्या बाजूने फक्त तेलकट दिसते मात्र आतून कोरडीच राहते. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होतो. तसेच त्वचा देखील काळवंडलेली दिसते.

अशावेळी तुपापासून तयार करण्यात आलेला फेस पॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चेहऱ्यावरील ग्लो वाढावा म्हणून तुम्ही या फेस पॅकचा उपयोग करू शकता.

होम मेड मॉयश्चरायजर

एखाद्या मॉयश्चरायजरप्रमाणे तूप चेहऱ्यावर कार्य करते. चेहऱ्याला तुपापासून तयार केलाल फेस पॅक तुम्ही लावला असेल तर तो पूर्ण सुकल्यानंतर गुलाबपाणी त्यावर स्प्रे करा. त्यानंतर हलक्या हाताने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे डेड स्किन सेल्स पूर्णपणे निघून जाईल. तसेच चेहऱ्याला पोषक तत्त्वांचा देखील पुरवठा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT