Girls Expectations esakal
लाइफस्टाइल

Girls Expectations : ना बंगला ना गाडी, मुलींना पार्टनरकडून फक्त या 4 गोष्टींची अपेक्षा असते

मुलींना पार्टनरकडून गाडी, बंगला या गोष्टींची अपेक्षा नसते. तर त्यांना या चार गोष्टी पार्टनरकडून अपेक्षित असतात

साक्षी राऊत

Girls Expectations : प्रत्येक मुलीची तिच्या पार्टनरकडून काहीना काही तरी अपेक्षा असते. मात्र अनेकदा मुलांना या अपेक्षा ओळखता येत नाही. तर काहींना मुलींना फक्त महागड्या गोष्टीच आवडतात असे वाटते. मुलींंचे मन समजून घेणे एवढे सोपे नाही. मुली स्वत:च हे मान्य देखील करतात की त्यांचे मन कधीही एकसारखे नसते. त्यांना पार्टनरकडून गाडी, बंगला या गोष्टींची अपेक्षा नसते. तर त्यांना या चार गोष्टी पार्टनरकडून अपेक्षित असतात. त्या कोणत्या ते जाणून घेऊया.

अनेकांना असे वाटते की, एखादी मुलगी श्रीमंतीमुळे तिच्या लव्ह पार्टनरकडे आकर्षित होते, परंतु ही गोष्ट नेहमीच खरी ठरत नाही, कारण अशी अनेक उदाहरणे आहेत की जेव्हा एखादी स्त्री, बंगला, गाडी, पैसा, संपत्ती सोडून फक्त प्रेमाची अपेक्षा करत असते. चला जाणून घेऊया मुलीला तिच्या पुरुष जोडीदाराकडून कोणत्या 4 गोष्टी हव्या असतात.

1. नात्यात खोटेपणाला स्थान न देणारा जोडीदार

कोणत्याही नात्याचा पाया हा सत्य आणि विश्वासावर असतो, त्यात खोट्याचा प्रवेश असेल तर नात्यात दुरावा येतो. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या जोडीदाराने कधीही फसवणूक करू नये आणि आयुष्यभर सत्याचे नाते जपावे.

2. तुम्हाला स्पेशल फिल करून देणारा जोडीदार

प्रत्येक मुलीची ही इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिला स्पेशल फिल द्यावा, आणि जाणीव करून द्यावी की त्याच्यासाठी ती किती खास आहे. केवळ स्तुती करणे पुरेसे नाही, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, जेणेकरून त्यांना विशेष वाटेल.

3. तिला आधार देणारा पार्टनर

स्त्रियांना त्यांच्या पार्टनरकडून प्रेम हवे असते यात शंका नाही, पण आदराशिवाय प्रेम अपूर्ण वाटते. आयुष्यात जोडीदाराने कठीण प्रसंगातही साथ द्यावी, कितीही संकटे आली तरी आधाराची कमतरता कधीच भासू नये, अशी त्यांची इच्छा असते. अशा व्यक्तीसोबत तिला खूप सुरक्षित वाटते.

4. कॉलिटी टाइम स्पेंड करणारा जोडीदार

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर पोरांच्या करिअरची जबाबदारी वाढते आणि मग त्यांना कमी वेळ मिळतो, तरीही आठवड्याच्या सुट्टीत क्वालिटी टाइम घालवतो. हँग आउट करण्याचा कोणताही प्लॅन नसेल, तर घरी एकत्र डिनर किंवा मूव्हीचा बेत करा. (Relationship Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT