Hair Care  esakal
लाइफस्टाइल

Hair Care : मुलींनो केस धुण्याआधी आवर्जून करा हे काम, केस वाढण्याबरोबरच मजबूत होतील

आज आपण केस धुताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Hair Care : हेअर वॉश करणे म्हणजे केवळ केस धुणे नसते तर हेअर वॉश करताना तुमचे केस डॅमेज होऊ नये यासाठी सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते. हल्ली बाजारात विकल्या जाणाऱ्या बहुतांश हेअर प्रोडक्टमध्ये केमिकल्स असतात. अनेकजण केस धुताना शाम्पू आणि हेअर कंडिशनरचा वापर करतात. मात्र हे करताना सावधगिरी बाळगावी. आज आपण केस धुताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

केसांना आधी ओले करावे

काही लोक केस धुताना ड्राय केसांवरच शाम्पू अप्लाय करतात. मात्र असे करणे केसांसाठी नुकसानदायी ठरू शकते. तेव्हा केसांना शाम्पू लावण्याआधी त्याला व्यवस्थित धुवून घ्या. ओल्या केसांवर शाम्पू लावल्याने तो स्कॅल्प आणि केसांना व्यवस्थित लागेल आणि केसांची स्वच्छता चांगली होईल.

Hair Care

केसांच्या प्रकारानुसार शाम्पू लावा

केसांमध्ये कुठल्याही प्रकारचा शाम्पू लावू नका. तुम्ही तुमच्या हेअर टाइपनुसार शाम्पू अप्लाय केल्यास त्याने तुमच्या केसांना इजा होणार नाही. जर तुमचे केस नॉर्मल असतील तर केसांसाठी जेंटल शाम्पूचा वापर करा. दाट केसांसाठी मॉश्चरायझर शाम्पूचा वापर करा. किंवा केसांच्या प्रकारानुसार शाम्पू वापरण्यासाठी आधी एक्सपर्टचा सल्ला घ्या.

अतिशय गरम पाण्याने केस धुवू नये

केस धुताना अतिशय गरम पाण्याचा वापर केल्यास त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या केसांतील न्यूट्रिएंट्स आणि ऑइल निघून जाते. यामुळे तुमचे केस ड्राय होऊ शकते आणि डँड्रफ वाढण्याचा धोकाही वाढतो. (hair care)

योग्य कंडिशनरचा वापर करा

केसांना धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करावा. हेअर वॉशनंतर कंडिशनर लावल्याने तुमचे केस स्मूथ राहातात. मात्र हेअर टाइपनुसार हेअर कंडिशनर वापरावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT