Women_Wedding esakal
लाइफस्टाइल

मुलींनो, लग्न ठरलंय? मग आधी या गोष्टींची काळजी घ्या

सकाळ डिजिटल टीम

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा असतो. लग्न ठरल्यापासून ते अगदी होईपर्यंत आणि नंतरही रिसेप्शन तसेच हनिमून अशा विविध गोष्टींची तयारी करावी लागते. ही सर्व तयारी करताना मुलींची खूप दमछाक होते. नववधू नेहमीच त्यांच्या लूकबद्दल टेन्शनमध्ये असतात, शिवाय सासरच्या घरात पहिला दिवस कसा जाईल याचीही काळजी त्यांना सतावत असते. अशा परिस्थितीत ज्या मुलींचे लग्न ठरलंय त्यांनी या 4 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

1) अनेकदा मुली लग्नाआधी इतकं टेन्शन घेतात की, बऱ्याचदा त्यांना लग्नसोहळ्याची मजा घेता येत नाही. या काळात अनावश्यक तणाव आणि काळजी घेणे टाळलं पाहिजे. हा तणाव केवळ तुमच्या मानसिक आरोग्यावरच नाही तर तुमच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम करतो. तुम्हाला थकवा जाणवू शकतो, तसेच तुमची त्वचा निस्तेज होऊ शकते.

2) लग्नासाठीची पॅकींग, पार्लरशी संबंधित कामे, मेहंदी या सगळ्या गोष्टींचं नियोजन आधीच करणे उत्तम. शेवटच्या क्षणापर्यंत तयारी करणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे लग्नाच्या काही दिवस आधीच तुम्हाला जे काही करायचंय ते पक्कं ठरवा.

3) या गडबडीच्या काळात त्वचेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, व्यस्त वेळापत्रकामुळे मुली लग्न ऐन तोंडावर असताना त्वचेकडे लक्ष देत नाहीत. तसेच वारंवार बाजारात चक्कर मारल्यामुळे तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवता. ज्यामुळे तुम्हाला स्वतःला हायड्रेट देखील ठेवता येत नाही, परिणामी लग्नाच्या दिवशी त्वचा खूप निस्तेज दिसते.

4) लग्नाच्या गडबड गोंधळात आपण अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी विसरतो. अशा परिस्थितीत, आपल्याला खरेदी करावयाच्या गोष्टींची एक यादी तयार करा आणि नंतर आपण खरेदी केलेल्या वस्तूंवर टीक करा. अशा प्रकारे खरेदी करणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT