लाइफस्टाइल

Shravan 2024: श्रावणात दही अन् 'या' भाज्या खाणे टाळा, जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक अन् आयुर्वेदीक कारण

श्रावण महिन्यात आहार घेताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

सकाळ डिजिटल टीम

जुलै महिना संपताच सणवाराला सुरुवात होते. विशेष म्हणजे श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. सगळेचजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात. उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर, महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 05 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. (green leafy vegetables and curd not eat in shravan month know all scientific and religious reasons )

या महिन्यात आहार घेताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यावेळी दह्याचे सेवन केलं जातं. पण आयुर्वेदानुसार, श्रावण महिन्यात दह्याचे सेवन करणं चुकिचं म्हटलं आहे. तसेच काही भाज्यादेखील खाणं टाळलं पाहिजे असंही त्यामध्ये सांगितलं आहे.

असं सांगण्यामागे वैज्ञानिक कारणदेखील आहे.

लोकांना या महिन्यात मांसाहार आणि कांदा-लसूण टाळून सात्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या सर्वांचा त्याग करण्याबरोबरच श्रावणात पालेभाज्या, दही आणि मोहरिची भाजी यांचा त्याग करावा असेही शास्त्रात सांगितले आहे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, श्रावणात दही, दूध आणि भाज्या का खाऊ नये.

धार्मिक कारण काय आहे?

असे मानले जाते की, सात्विक अन्न खाल्ल्याने पवित्रता आणि अध्यात्म वाढते. सात्विक अन्न ताजे आणि हलके असते. दही पालेभाज्या, पौष्टिक आहेत परंतु ते त्याची तयार करण्याची पद्धत ही सात्विक नसते.

याशिवाय असा दावा केला जातो की भगवान शिवाला निसर्ग आणि नैसर्गिक गोष्टी खूप आवडतात. त्यानंतरच भांगाच्या पानांपासून ते बेलच्या पानांपर्यंत सर्व काही त्यांना अर्पण केले जाते.

शिवलिंगाला दूध आणि दह्याने अभिषेक केला जातो. अशा परिस्थितीत आपण ज्या वस्तूंसह भगवान शंकराची पूजा करतो, त्यांचे सेवन करणे चुकीचे असल्याचे पंडितांचे म्हणणे आहे. त्यामुळं श्रावणामध्ये भाज्या, दूध, दही यांचे सेवन करू नये.

वैज्ञानिक कारण काय आहे?

श्रावण महिन्यात पाऊस असतो. जीव-जंतू, विषाणू व कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. आपल्याला माहीत आहे की दही बॅक्टेरियापासून बनते. दह्यात तामसी गुण असतात, त्यामुळे ते पावसाळ्यात खाणे टाळले जाते.

आयुर्वेदानुसार तामसी आहारामुळे (अति तिखट, मांसाहारी) आळस, सुस्ती येऊ शकते. याशिवाय दही खाल्ल्याने सर्दी, खोकला यांसारख्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे भक्तांच्या अध्यात्म अभ्यासात अडथळे येतात.

पालेभाज्यांमध्येही कीटक असतात, त्यामुळे पानं दूषित होतात. ही पानं जनावरे खातात जे आपल्याला दूध देतात. त्यामुळे श्रावण महिन्यात दूध, पनीर, दही अशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT