Green Tea Shampoo sakal
लाइफस्टाइल

घरीच बनवा Green Tea Shampoo; केस होतील घनदाट, सिल्की

सकाळ डिजिटल टीम

केस दाट आणि सिल्की होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. यासाठी पार्लरला जाऊन अनेक प्रयोग केले जातात. केसांना तेल लावण्यापासून ते शाम्पू कोणता वापरावा याचा बारकाईने विचार केला जातो. ग्रामीण भागात बऱ्याच घरात घरगुती उपायांवर भर दिला जातो. कधी तेलात जास्वंदीचे फूल घातले जाते तर कधी कापराचा वापर केला जातो. काही ठिकाणी तर माका या रान वनस्पतीचा वापर करून तेल बनवले जाते. मात्र या प्रोसेसमध्ये केसांच्या सुरेक्षेसाठी हेअर वाॅश खूप गरजेचे असते. आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळे शाम्पू उपलब्ध आहेत. मात्र यामध्ये केमीकल्स ची मात्रा जास्त असते. यामुळे केस डॅमिज होऊ शकतात. अशावेळी केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी हर्बल शाम्पूचा वापर करा. हा शाम्पू विकत आणण्याची गरज नाही तर घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. आज तुम्हाला ग्रीन टी पासून शाम्पू कसा बनवायचा हे सांगणार आहोत. ग्रीन टी स्किनसाठी खूप उपयुक्त आहे. तसेच त्याचा फायदा केसांना होतो. चला जाणून घेऊया कसा तयार करायचा शाम्पू.

साहित्य

ग्रीन टी ची पाने

पिपरमिंट तेल

लिंबाचा रस

नारळाचे तेल

अॅपल साईडर व्हिनेगर

कृती

ग्रीन टी च्या पानांना वाळवून पावडर बनवून घ्या. यात आता एक चमचा अॅपल साईडर व्हिनेगर ,पिपरमिंट तेलाचे दोन थेंब, लिंबाचा रस, मध,नारळाचे तेल घालून हे मिश्रण मिक्स करून घ्या.आता हा शाम्पू एका पॅकबंद बाॅटेलमध्ये भरून ठेवा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर तुम्ही हे वापरू शकता.

असा होतो केसांना फायदा

ग्रीन टी त अॅटी आक्सीडेंट, व्हिटामीन सी, अमिनो अॅसीड, जिंक सारखी पोषक तत्वे असतात. याच्या वापराने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. केसांना मसाज केल्यास ब्लड सक्युलेशन चांगले होते. यामुळे केस वाढण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: केसांना कोणताही शाम्पू वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT